मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

खोपोलीत सतर्क पोलिसांचा थरारक पाठलाग!

तुळींज येथून चोरीला गेलेली रिक्षा जप्त, दोघांना अटक


​खोपोली-रायगड, दि. २३ (प्रतिनिधी) :- रायगड पोलिसांच्या सतर्क गस्तीमुळे आणि तत्पर कारवाईमुळे वाहन चोरीचा एक मोठा गुन्हा उघडकीस आला आहे. खोपोली शिळफाटा परिसरात नेहमीप्रमाणे बीट मार्शलच्या माध्यमातून नियमित पेट्रोलिंग सुरू असताना पोलिसांना एका संशयास्पद हालचाली करणाऱ्या रिक्षाचा सुगावा लागला आणि पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे थेट तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेली रिक्षा हस्तगत करण्यात यश आले आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, खोपोली शिळफाटा भागात बीट मार्शलचे पथक रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना एमएच ४८ बीएफ ८७३६ क्रमांकाची रिक्षा अत्यंत संशयास्पदरित्या रस्त्यावरून जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. रिक्षाचालकाची हालचाल आणि एकूणच संशयास्पद स्थिती पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी रिक्षा थांबवण्याचा इशारा केला. मात्र पोलिसांना पाहताच चालकाने रिक्षाचा वेग वाढवून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता तातडीने या संशयास्पद रिक्षेचा पाठलाग सुरू केला आणि अखेर काही अंतरावर रिक्षाला अडवून त्यामधील दोन्ही इसमांना शिताफीने ताब्यात घेतले.

​ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयितांकडे वाहनाच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत आणि त्यांची उडवाउडवीची उत्तरे पोलिसांचा संशय अधिक बळावणारी ठरली. यानंतर पोलिसांनी या दोघांना अधिक विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली तसेच वाहनाच्या नोंदणी क्रमांकाची माहिती तपासली असता धक्कादायक माहिती समोर आली. ही रिक्षा तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेली असल्याचे निष्पन्न झाले असून त्याबाबत तुळींज पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा देखील नोंद असल्याचे समोर आले. पोलिसांनी चोरीची रिक्षा जप्त करत दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे. रायगड पोलिसांच्या या तत्परतेमुळे आणि प्रभावी पेट्रोलिंगमुळे चोरीचा मोठा उलगडा झाल्याने नागरिकांमधून पोलिसांच्या या धडक कामगिरीचे मोठे कौतुक केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog