मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

रोह्यातील दमखाडी येथून इसमाचे अपहरण

रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


​रोहा-रायगड, दि. २४ (प्रतिनिधी) :- रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दमखाडी परिसरातून एका इसमाला अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून रोहा पोलीस ठाण्यात अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, रोहा शहरातील दमखाडी येथील फिर्यादी यांच्या राहत्या घरातून त्यांचे मामा कोणालाही काही एक न सांगता अचानक निघून गेले होते. बराच वेळ उलटूनही ते परत न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. त्यानंतर नातेवाईकांनी तात्काळ आजूबाजूचा परिसर, परिचित व्यक्ती, मित्रपरिवार तसेच जवळच्या इतर नातेवाईकांकडे त्यांची कसून चौकशी केली. मात्र, सर्व ठिकाणी शोध घेऊनही त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर कोणीतरी अज्ञात इसमाने स्वतःच्या फायद्यासाठी किंवा अन्य कारणाने त्यांना कायदेशीर रखवालीतून फुस लावून, फसवून पळवून नेले असल्याचा संशय बळावल्याने नातेवाईकांनी रोहा पोलिसांकडे धाव घेतली.
​या तक्रारीच्या आधारे रोहा पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ३००/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४०(३) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या असून, त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी विविध पातळ्यांवर तपास यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास महिला पोलीस हवालदार प्रशिला साळुंखे या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

Comments

Popular posts from this blog