मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

पेणमधील कुंभारआळी येथे धाडसी घरफोडी!

कपाट फोडून पावणेतीन लाखांची रोकड व सोन्याचे दागिने लंपास


​पेण-रायगड, दि. ३ (प्रतिनिधी) :- पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कुंभारआळी येथे एका घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्याने धाडसी घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. चोरट्याने घराचा कडी-कोयंडा कापून घरात प्रवेश केला आणि लोखंडी कपाटातील तब्बल २ लाख ९४ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच मौल्यवान सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या घटनेमुळे कुंभारआळी परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, कुंभारआळी येथील फिर्यादी यांच्या घराचा मुख्य दरवाजा बंद असताना अज्ञात चोरट्याने संधी साधून दरवाजाचे लॉक कोणत्यातरी हत्याराच्या साहाय्याने कापले आणि घरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने घरातील खोलीत ठेवलेल्या लोखंडी कपाटाचे दरवाजे तसेच कपाटातील अंतर्गत लॉकर हत्याराने फोडून कपाटामध्ये सुरक्षित ठेवलेली २ लाख ९४ हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याच्या वस्तू स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेल्या. फिर्यादी यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तात्काळ पेण पोलीस ठाण्यात धाव घेऊन या चोरीबाबत रीतसर तक्रार दाखल केली.
​या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २१३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३३१(४) आणि ३०५(A) अन्वये घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून चोरट्याचा माग काढण्यासाठी तपास चक्रे वेगाने फिरवली आहेत. या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास पेण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण करत आहेत.

Comments

Popular posts from this blog