मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

नागोठणे येथील मर्कज ऑर्किड अपार्टमेंट परिसरातून दुचाकी लंपास

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल


​नागोठणे-रायगड, दि. ३ (प्रतिनिधी) :- नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीची घटना उघडकीस आली असून, अज्ञात चोरट्याने इमारतीच्या आवारात उभी केलेली मोटारसायकल चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. रोहा तालुक्यातील नागोठणे येथील मर्कज ऑर्किड अपार्टमेंट परिसरात ही घटना घडली आहे. फिर्यादी यांनी आपली सुमारे १७ हजार रुपये किमतीची मोटारसायकल नेहमीप्रमाणे अपार्टमेंटच्या परिसरात पार्क करून ठेवली होती. दरम्यान, कोणाचीही नजर नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि लबाडीच्या इराद्याने, फिर्यादीच्या संमतीशिवाय सदर दुचाकी चोरून पोबारा केला.
​आपली मोटारसायकल जागेवर दिसून न आल्याने फिर्यादी यांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला, मात्र दुचाकीचा कोणताही थांगपत्ता न लागल्याने अखेर त्यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद नोंदवली. या तक्रारीवरून नागोठणे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर १८२/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या चोरीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये वाहनांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे. पोलीस आता या परिसरातील संशयितांची चौकशी करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस अंमलदार शेरमकर या करत आहेत.

Comments

Popular posts from this blog