मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

खोपोली परिसरातील ताकई येथून १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण

अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल


​खोपोली-रायगड, दि. ९ (प्रतिनिधी) :- खालापूर तालुक्यातील ताकई येथून एका अल्पवयीन मुलाचे अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधित घटनेप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, ताकई (ता. खालापूर) येथे राहणाऱ्या फिर्यादी यांचा अवघ्या १३ वर्षे ११ महिने वयाच्या अल्पवयीन मुलाला दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साधारण सात वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले. मुलगा अल्पवयीन असल्याने त्याच्या अज्ञानाचा आणि निरागसतेचा गैरफायदा घेत अज्ञात कारणासाठी त्याला पळवून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. बराच वेळ मुलगा घरात न दिसल्याने कुटुंबीयांनी आजूबाजूच्या परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोधाशोध केली, मात्र त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर मुलाचे अपहरण झाल्याची खात्री पटल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने खोपोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

​या तक्रारीच्या आधारे खोपोली पोलिसांनी भादंविच्या नव्या भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १३७(२) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१४/२०२६ नुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आहेत. घटनेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून संशयित हालचालींवर बारीक नजर ठेवली जात आहे. खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. एडवळे हे या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

Comments

Popular posts from this blog