मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले

पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


​पोयनाड-रायगड, दि. ६ (प्रतिनिधी) :- अलिबाग तालुक्यातील मौजे वाघोडे ब्रिजजवळून एका १७ वर्षे ५ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोयनाड पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी ही मौजे वाघोडे ब्रिज परिसरामध्ये असताना दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १:४५ वाजल्यापासून ते दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १:४५ वाजण्याच्या कालावधीत ही घटना घडली. संबंधित संशयित आरोपीने मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेतला. तिला गोड बोलून, विविध प्रलोभने दाखवून फूस लावली आणि तिच्या आई-वडिलांच्या कायदेशीर संरक्षणातून पळवून नेले. आरोपीने या कृत्यासाठी 'एम एच ४६ डी.बी. ०६४०' या क्रमांकाच्या मोटारसायकलचा वापर केला असून तिच्यावर बसवून तो मुलीला अज्ञात स्थळी घेऊन पसार झाला.
​मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, नातेवाईकांकडे चौकशी केली, मात्र तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर आरोपीने तिला दुचाकीवरून पळवून नेल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पीडित मुलीच्या आईने थेट पोयनाड पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली. दाखल फिर्यादीच्या आधारे पोयनाड पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ९३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस आरोपी आणि त्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करत आहेत. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक म्हात्रे हे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog