मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

खोपोलीत विनापरवाना तलवार बाळगणाऱ्या दोघांवर पोलिसांची कारवाई!

एका अल्पवयीन बालकासह साथीदारावर गुन्हा दाखल


​खोपोली-रायगड, दि. २६ (प्रतिनिधी) :- खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आडोशी गावाच्या परिसरामध्ये बेकायदेशीररीत्या लोखंडी तलवार बाळगून फिरणाऱ्या दोघांवर खोपोली पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये एका सज्ञान आरोपीसह विधीसंघर्षीत बालकाचा समावेश असून, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून बेकायदा शस्त्र जप्त केले आहे. या कारवाईमुळे परिसरात विनापरवाना शस्त्रे बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, आडोशी गावातील धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर खोपोली पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी जगमवाडी, पोस्ट साजगाव, ता. खालापूर येथील रहिवासी असलेले दोन संशयित तरुण त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक (MH 46 CX 0290) वरून संशयास्पद हालचाली करताना पोलिसांच्या नजरेस पडले. पोलिसांनी तात्काळ त्यांची हालचाल टिपून त्यांना थांबवले आणि त्यांची कसून तपासणी केली. या तपासणी दरम्यान त्यांच्या ताब्यात विनापरवाना, बेकायदेशीररीत्या बाळगलेली घातक लोखंडी तलवार मिळून आल्याने पोलिसांनी तत्काळ ती जप्त केली.

​या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी व विधीसंघर्षीत बालकाविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३(५) सह शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ आणि २५ अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर २८८/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे बेकायदा हत्यार बाळगण्यामागचा त्यांचा नेमका उद्देश काय होता, तसेच त्यांनी ही तलवार कुठून आणली होती, याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील अधिक तपास खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार माळी हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

Comments

Popular posts from this blog