मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

ध्वनीप्रदूषण व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७ डीजे चालक-मालकांवर सातारा पोलिसांची धडक कारवाई!

शाहूपुरी व सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल


सातारा, दि. ६ (प्रतिनिधी) :- ​सातारा शहर व परिसरात सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी सातारा पोलिसांनी नियम मोडणाऱ्या डीजे चालक आणि साऊंड सिस्टिम मालकांवर कारवाईचा मोठा बडगा उगारला आहे. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर यांच्या थेट मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाणे आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पथकांनी ही धडक कारवाई केली असून एकूण ७ वेगवेगळे गुन्हे नोंदवले आहेत.

​या कारवाईबाबत सविस्तर वृत्त असे की, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात डीजे वाजवून ध्वनीप्रदूषण करणे तसेच प्रशासकीय आदेशांचा अवमान करणाऱ्या साऊंड मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. नोंदवलेल्या ७ गुन्ह्यांपैकी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४, तर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ गुन्ह्यांचा समावेश आहे. संबंधित सर्व आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३ म्हणजेच लोकसेवकाने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे, आणि कलम २८५ म्हणजेच सार्वजनिक मार्गात अडथळा निर्माण करणे या कलमांनुसार कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

​शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये गुन्हा क्रमांक २२१/२६ अन्वये रोहित बाचल आणि साऊंड मालक रोहन गोरे यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २२३ नुसार कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गुन्हा क्रमांक २२२/२६ मध्ये साऊंड मालक आरिफ मुलाणी, गुन्हा क्रमांक २२३/२६ मध्ये साऊंड मालक सूरज दिनकर पवार आणि गुन्हा क्रमांक २२४/२६ मध्ये साऊंड मालक अभिषेक रवींद्र चव्हाण या तिघांवरही प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी BNS कलम २२३ अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत.

​दुसऱ्या बाजूला सातारा शहर पोलीस ठाण्यातही डीजे मालकांवर कठोर पावले उचलण्यात आली आहेत. तेथे दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक ६१३/२६ अंतर्गत साऊंड सिस्टिम मालक विवेक सुनील भोसले, प्रतीक सुनील माने आणि सूरज सुधीर सपकाळ या तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २२३ सोबत सार्वजनिक मार्गात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कलम २८५ अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

​केवळ एवढ्यावरच न थांबता, पोलीस प्रशासनाने या कारवाईचा परिघ आणखी वाढवला असून संबंधित सर्व आरोपी डीजे चालक व मालकांविरोधात ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमांनुसार पुढील कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे प्रस्ताव वेगाने तयार केले जात आहेत. सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचवणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई कायम राहील असा स्पष्ट इशारा सातारा पोलिसांनी दिला असून, सर्व नागरिकांनी आणि साऊंड सिस्टिम चालकांनी ध्वनीप्रदूषणाबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, प्रशासनाच्या आदेशांचा मान ठेवावा आणि कायद्याचे उल्लंघन होईल असे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog