मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

माणगाव येथील 'छत्रपती करिअर अकॅडमी'तर्फे सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण बॅचेस सुरू!

 युवकांसाठी सुवर्णसंधी 


माणगाव-रायगड, दि. १७ (प्रतिनिधी) :- संरक्षण दल आणि पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी माणगाव येथील 'छत्रपती करिअर अकॅडमी'च्या वतीने विशेष भरती पूर्व प्रशिक्षण बॅचेस सुरू करण्यात आल्या आहेत. शिक्षण क्षेत्रात गेल्या १० वर्षांहून अधिक काळाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या या संस्थेने भरतीची १०० टक्के हमी देणारे परिपूर्ण नियोजन आखले असून, २०२६ मध्ये होणाऱ्या आगामी मेगा वनरक्षक भरतीसाठी ३ महिन्यांची विशेष बॅच देखील सुरू करण्यात आली आहे.

​या अकॅडमीमध्ये पोलीस भरती (राज्य पोलीस), आर्मी भरती, होमगार्ड, वनरक्षक भरती, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक दल (MSF), एअरफोर्स, नेव्ही, कोस्ट गार्ड तसेच तलाठी आणि इतर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे परिपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे. मुलांसह मुलींसाठी येथे स्वतंत्र विशेष बॅचेस चालवल्या जात असून, यात ८० गुणांची मैदानी चाचणी (फिजिकल ट्रेनिंग) आणि १२० गुणांच्या लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी करून घेतली जाते. यामध्ये मैदानी सरावासाठी मुलांकरिता १७ मिनिटांत ५ किमी आणि मुलींकरिता १२ मिनिटांत ३ किमी धावण्याच्या सरावासह दररोज २ तास कसून फिजिकल सराव करून घेतला जातो. त्याचबरोबर लेखी परीक्षेसाठी मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांचे सखोल मार्गदर्शन अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकांकडून दिले जात असून, मराठी व गणितासाठी स्वतंत्र बॅचेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

​विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि यशाची खात्री करण्यासाठी अकॅडमीमध्ये नियमित सराव टेस्ट, वैयक्तिक करिअर समुपदेशन, राहण्यासाठी उत्तम निवास व्यवस्था, जेवणाची सोय आणि मुलींसाठी स्वतंत्र व सुरक्षित हॉस्टेलची सुविधा उपलब्ध आहे. तसेच ग्रुपने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फी सवलत दिली जात असून शिस्त, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवणे हेच संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. साईनगर, निजामपूर रोड, माणगाव (रायगड) येथे सुरू असलेल्या या प्रशिक्षण शिबिरासाठी व अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी ७८८७७९८८३२ किंवा ९०६७४२१३९५ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog