मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

'पायोनियर गॅस' कंपनीतून १ लाखांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या नालासोपारा येथील चोरट्याला अटक

 माणगाव पोलिसांत गुन्हा दाखल 


​माणगाव-रायगड, दि. २४ (प्रतिनिधी) :- माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भगाड येथील ‘पायोनियर गॅस कंपनी’मध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, पोलिसांनी चोरीच्या मुद्देमालासह एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेला संशयित आरोपी हा गागडेपाडा, नवजीवन रोड, धानीव, नालासोपारा (पूर्व), जिल्हा पालघर येथील रहिवासी आहे.

​सदर आरोपी हा काही संशयास्पद मुद्देमालासह कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये फिरताना आढळून आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील साहित्याबाबत अधिक चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे कोलाड पोलीस ठाण्यात मुंबई पोलीस अधिनियम कलम १२४ अन्वये अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

​यानंतर मा. न्यायालयाच्या रीतसर परवानगीने या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी भगाड येथील पायोनियर गॅस कंपनीमधून सुमारे १,००,०००/- (एक लाख) रुपये किमतीचा मुद्देमाल चोरल्याचे निष्पन्न झाले.

​या संपूर्ण प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(a), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार सानप हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

Comments

Popular posts from this blog