मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

दुचाकीवर बनावट नंबर प्लेट लावून शासनाची फसवणूक!

 कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल 


कर्जत-रायगड, दि. १८ (प्रतिनिधी) :- ​कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट नंबर प्लेट वापरून शासनाची आणि पोलीस प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या एका दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई काल, दिनांक १७ जुलै २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास चारफाटा, कर्जत येथे करण्यात आली. या प्रकरणी कर्जत तालुक्यातील पोटलवाडी येथील रहिवासी असलेल्या आरोपीविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पोलीस विभागाकडून मोटार वाहन कायद्यानुसार कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई होऊ नये आणि कारवाई झाल्यास लागणारा आर्थिक भुर्दंड स्वतःला सोसावा लागू नये, या उद्देशाने हा गैरप्रकार केला होता. आरोपीच्या स्वतःच्या मालकीची 'होंडा ॲक्टिव्हा' स्कूटी (जिचा मूळ आणि खरा क्रमांक एमएच ४६ एटी ९१०५ असा आहे) ची खरी नंबर प्लेट त्याने मुद्दाम काढून ठेवली होती. त्यानंतर त्याने पोलीस कारवाई टाळण्यासाठी कुठूनतरी 'एमएच ४६ बीएच ६७३४' या क्रमांकाची एक बनावट नंबर प्लेट तयार करून घेतली. ही नंबर प्लेट बनावट असल्याचे पूर्णपणे माहीत असतानाही, त्याने ती आपल्या स्कूटीवर लावली आणि ती गाडी स्वतः वापरण्यासोबतच इतरांनाही वापरण्यासाठी देऊन शासनाची उघडपणे फसवणूक केली.

​चारफाटा येथे तपासणी दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर कर्जत पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर २९९/२०२६ नुसार, मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ३९ व १९२, तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३१८(४), ३३६(२), ३३६(३) आणि ३४०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती मनीषा लटपटे यांच्याकडून केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog