मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

म्यूल बँक खाते वापरून सायबर फसवणूक!

 कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल 


कर्जत-रायगड, दि. २८ (प्रतिनिधी) :- ​कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सायबर गुन्हेगारीला खतपाणी घालणारा एक गंभीर प्रकार समोर आला असून, युको बँकेचे 'म्यूल बँक खाते' (Mule Bank Account) वापरून सर्वसामान्य आणि निष्पाप नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १७ सप्टेंबर २०२ breakdown/२०२५ च्या मध्यरात्री १२:०० वाजेपासून ते २० जानेवारी २०२६ रोजीच्या मध्यरात्री १२:०० वाजेच्या कालावधीत घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

​या प्रकरणातील आरोपी क्रमांक १ आणि आरोपी क्रमांक २ यांनी आपापसात संगनमत करून व फौजदारी पात्र कट रचून मौजे युको बँकेचे एक खाते उघडले. देशामधील वेगवेगळ्या राज्यांतील निष्पाप आणि सर्वसामान्य नागरिकांची सायबर गुन्हेगारांकडून होणाऱ्या फसवणुकीतून प्राप्त होणारी बेकायदेशीर व अपहरित रक्कम या खात्यात वळती केली जात होती. आरोपींना ही सर्व रक्कम बेकायदेशीर मार्गाने आलेली आहे आणि ही फसवणूक व अपहाराची रक्कम आहे, याची पूर्ण कल्पना होती. तरीही त्यांनी कोणत्याही प्रकारची कायदेशीर भीती न बाळगता ही रक्कम इतर विविध खात्यांवर वळती करण्यासाठी आपल्या बँक खात्याचा वापर करू दिला.

​या बेकायदेशीर कृत्याच्या बदल्यात दोन्ही आरोपींनी ठरल्याप्रमाणे कमिशनच्या स्वरूपात मोठी रक्कम स्वीकारून स्वत:चा अवाजवी आणि बेकायदेशीर आर्थिक फायदा करून घेतला आहे. सर्वसामान्य पीडित नागरिकांची फसवणूक करून मिळवलेला पैसा सुरक्षितपणे हलवण्यासाठी 'म्यूल अकाउंट'चा वापर करण्याचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

​या संपूर्ण आर्थिक गैरव्यवहार आणि सायबर फसवणुकीच्या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१७(५), ६१(२), ४९ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या गुन्ह्याचा पुढील अधिक व सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक किरण नवले हे करत आहेत.

Comments

Popular posts from this blog