मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

कांदिवलीतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार व हत्या प्रकरण; पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी मुंबई प्रदेश महिला काँग्रेस आक्रमक!

 ​समता नगर पोलीसांना दिले निवेदन 


बोरीवली-​मुंबई, दि. १३ (प्रतिनिधी) :- कांदिवली येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या क्रूर बलात्कार आणि हत्येच्या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणातील नराधम आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला त्वरित व निष्पक्ष न्याय मिळावा, या मागणीसाठी 'अखिल भारतीय महिला काँग्रेस'च्या अध्यक्षा अलका लांबा यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली मुंबई प्रदेश महिला काँग्रेसच्या शिष्टमंडळाने समता नगर पोलीस ठाण्याला भेट देऊन तीव्र भावना व्यक्त केल्या.










​या महत्त्वपूर्ण आंदोलनाचे आणि शिष्टमंडळाच्या भेटीचे आयोजन उत्तर मुंबई जिल्हाध्यक्षा सौ. प्रगती राणे-लोकरे यांनी केले होते. या आंदोलनाला नगरसेविका डॉ. सौ. अजंता यादव यांनीही सक्रिय पाठिंबा दिला. अत्यंत संवेदनशील असलेल्या या प्रसंगी मृत मुलीचे कुटुंबीय आणि तिची आई देखील न्याय मागण्यासाठी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत उपस्थित होते.

​या जनआंदोलनात आणि पोलीस प्रशासनाला जाब विचारण्याच्या मोहिमेत महिला काँग्रेसच्या जिल्हा महासचिव पूनम शिंदे, ब्लॉक १४ च्या अध्यक्षा नंदा तलवटकर, ब्लॉक सचिव सुरेखा आलमवार, ब्लॉक उपाध्यक्ष गायत्री टपाल, राजश्री एकलदेवी तसेच मालाडच्या तालुका अध्यक्षा राजश्री मांजरेकर, ॲड. ज्योती फोगला, बोरीवलीच्या तालुका अध्यक्षा हेमा वाघेला, सना खान, गीता पवार, शीतल पवार, साधना पांडे यांच्यासह महिला काँग्रेसचे इतर सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

​महिला काँग्रेसच्या या शिष्टमंडळाने समता नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जयवंत शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सुपूर्द केले. या गुन्ह्याचा तपास अत्यंत जलद, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा, जेणेकरून आरोपीला लवकरात लवकर फाशी किंवा कठोरतम शिक्षा होईल, अशी आग्रही मागणी शिष्टमंडळाने केली. यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जयवंत शिंदे यांनी शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिला. या प्रकरणात पोलिसांचे पूर्ण सहकार्य लाभेल अशी ग्वाही देत, कायद्याच्या चौकटीत राहून तपास वेगाने केला जाईल आणि पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Comments

Popular posts from this blog