मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

महाड शहरात घरफोडी!

करंजखोल येथील बंद घर फोडून ९६ हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लांबवली


​महाड-रायगड, दि. २८ (प्रतिनिधी) :- महाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करंजखोल गावच्या हद्दीत असलेल्या रायगड सिटी इमारतीमध्ये घरफोडीची एक घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी व साक्षीदार घराबाहेर गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून घरातील ९६ हजार रुपयांचा ऐवज लांबवला आहे.
​सविस्तर वृत्त असे की, दिनांक २५ जुलै २०२६ रोजी रायगड सिटी इमारतीमधील रहिवासी कामानिमित्त घराबाहेर गेले होते. घर बंद असल्याचे पाहून अज्ञात आरोपीने मुख्य दरवाजाची कडी, कोयंडा आणि कुलूप अज्ञात हत्याराच्या साहाय्याने तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर आरोपीने बेडरूममधील कपाटाची उचकापाचक करून त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ९६,००० रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादीच्या संमतीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेला.
​घरमालक परत आल्यानंतर घराचा कडी-कोयंडा तुटलेल्या अवस्थेत दिसल्याने चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता (भा.दं.वि.) कलम ३८०, ४५४, ४५७ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हा नोंद (गु.नं. १०९/२०२६) दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप नाईक या घटनेचा पुढील अधिक तपास करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog