मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

महाडमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण!

 महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 


महाड, दि. ११ (प्रतिनिधी) :- महाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्याच एका मित्राने आमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून महाड शहर पोलीस ठाण्यात संबंधित संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना महाड येथील चवदार तळे परिसरातील शिवतीर्थ सोसायटी येथे घडली. पीडित मुलीच्या मित्राने तिला कोणतेतरी अज्ञात कारण सांगून, विविध आमिषे दाखवून तिच्या पालकांच्या कायदेशीर रखवालीतून आणि संमतीशिवाय पळवून नेले. आपली मुलगी घरातून बेपत्ता झाल्याचे आणि तिला तिच्या मित्रानेच पळवून नेल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीच्या पालकांनी तात्काळ महाड शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या घटनेची फिर्याद दिली. पालकांच्या या तक्रारीवरून महाड शहर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, आरोपीविरुद्ध महाड शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ९०/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १३७(२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलीस आता या प्रकरणाचा अत्यंत वेगाने तपास करत आहेत. या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या राऊत यांच्याकडे सोपवण्यात आला असून, पोलीस पथके पीडित मुलगी आणि तिला पळवून नेणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.

Comments

Popular posts from this blog