मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

कुरूळ येथील ‘कोकणट कासा विल्ला’मध्ये केअरटेकरकडून १ लाख २५ हजारांची चोरी!

 अलिबाग पोलिसांत गुन्हा दाखल 


अलिबाग-रायगड, दि. १३ (प्रतिनिधी) :- अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरुळ येथे एका केअरटेकरनेच मालकाचा विश्वासघात करून लाखोंचा डल्ला मारल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मौजे कुरुळ येथील गणेशगल्ली भागात राहणाऱ्या फिर्यादी यांच्या मालकीच्या ‘कोकणट कासा विल्ला’ या बंगल्यामध्ये हा चोरीचा प्रकार घडला. ११ जुलै २०२६ रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, या विल्लामध्ये केअरटेकर (रखवालदार) म्हणून काम करणाऱ्या आरोपीनेच हा कारनामा केला आहे. आरोपीने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय, लबाडीच्या हेतूने आणि स्वतःच्या फायद्यासाठी विल्लामधून एकूण १ लाख २५ हजार रुपये रोख आणि तितक्याच किमतीच्या मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून विश्वासू नोकरानेच अशा प्रकारे चोरी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याप्रकरणी फिर्यादी यांनी तात्काळ अलिबाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अलिबाग पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुरनं. १०९/२०२६ अन्वये, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०६ प्रमाणे (विश्वासघात व चोरी) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली असून, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस हवादार परेश म्हात्रे यांच्याकडे या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सोपवण्यात आला आहे. पोलीस सध्या फरार आरोपीचा शोध घेत असून लवकरच त्याला ताब्यात घेतले जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog