मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात!
कारच्या धडकेत स्कूटी चालक गंभीर जखमी


पोलादपूर-रायगड, दि. २५ (प्रतिनिधी) :- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल एका भरधाव कारने स्कूटीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. हा अपघात रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मौजे आंबेडकर नगरसमोरील गोवा लेनवर झाला. या अपघातात स्कूटी चालक गंभीर जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील नवसारी जिल्ह्यातील गनदेवी तालुक्यातील बिलीमोरा पोस्ट अंतर्गत येणाऱ्या तलोध येथील रहिवासी असलेला २१ वर्षीय कार चालक आपल्या ताब्यातील महिंद्रा मराजो कार (क्रमांक जी जे २६ टी ७०७६) घेऊन मुंबई-गोवा महामार्गाने गोव्याच्या दिशेने जात होता. यावेळी कार चालकाने रस्त्यावरील परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि आपली कार अत्यंत भरधाव वेगात व हलगर्जीपणाने चालवली. कार आंबेडकर नगरसमोरील महामार्गावर आली असता, समोरून मौजे आंबेडकर नगरकडे जाणाऱ्या स्कूटीला (क्रमांक एम एच ०८ बी जे ९७२४) कारने पाठीमागून जोरदार धडक दिली.

​ही धडक इतकी भीषण होती की, स्कूटी चालक किरण गौतम बावीसकर (वय २२ वर्षे) हा रस्त्यावर फेकला गेला. या अपघातात किरण बावीसकर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या तोंडाला आणि हातालाही मोठी इजा झाली आहे. तसेच या अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी जखमी चालकाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

​या घटनेप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८/२०२६ नुसार कार चालकाविरुद्ध मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम १८४, तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम २८१, १२५ (a) आणि १२५ (b) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील अधिक तपास पोलीस हवादार सुतार हे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog