मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

निगडोलीत वृद्ध दांपत्याची घरात घुसून धारदार हत्याराने गळा चिरून निर्घृण हत्या!
 खालापूर तालुक्यात खळबळ 


​खालापूर-रायगड, दि. २८ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मौजे निगडोली येथे एक धक्कादायक आणि अत्यंत थरारक घटना उघडकीस आली असून, अज्ञात मारेकऱ्यांनी घरात घुसून एका वृद्ध दांपत्याची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण खालापूर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मौजे निगडोली (पोस्ट माजगाव, तालुका खालापूर) येथे हे हत्याकांड घडले. अज्ञात इसमांनी हे कृत्य केले. फिर्यादी यांचे आजी आणि आजोबा हे निगडोली येथील त्यांच्या राहत्या घरात नेहमीप्रमाणे असताना, अज्ञात कारणावरून मारेकऱ्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. घरात घुसलेल्या या अज्ञात हल्लेखोरांनी वृद्ध दांपत्यावर धारदार हत्याराने थेट गळ्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, गंभीर दुखापत झाल्याने या वृद्ध पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
​घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या निर्घृण हत्येप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रं. २०२/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपींनी हे हत्याकांड नेमक्या कोणत्या कारणासाठी घडवून आणले, चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला की यामागे काही जुना वाद किंवा कौटुंबिक कारण आहे, याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे. या अत्यंत संवेदनशील आणि गंभीर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार हे स्वतः करीत असून, मारेकऱ्यांच्या शोधासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या दिशांनी तपासचक्रे फिरवली आहेत. लवकरच या प्रकरणाचा छडा लावून आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog