मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवले!
कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल


कर्जत-रायगड, दि. २१ (प्रतिनिधी) :- ​कर्जत तालुक्यातील चिंचेचीवाडी मोठे वेणगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ही घटना दिनांक १९ मे २०२६ रोजी सकाळी साधारण आठ वाजन्याच्या सुमारास मौजे चिंचेचीवाडी मोठे वेणगाव येथील फिर्यादी यांच्या राहत्या घरात घडली. फिर्यादी यांची मुलगी ही अवघी १४ वर्षे, ९ महिने आणि २४ दिवसांची असून ती कायद्याने पूर्णपणे अज्ञान आहे. ही मुलगी अल्पवयीन असल्याचे पूर्णपणे माहीत असतानाही, एका अज्ञात इसमाने तिच्या या अज्ञानपणाचा गैरफायदा घेतला. त्याने मुलीला विविध आमिषे दाखवून किंवा फुस लावून तिच्या राहत्या घरातून पळवून नेले आहे. मुलगी अचानक घरातून गायब झाल्याचे आणि सर्वत्र शोध घेऊनही ती कुठेही न सापडल्याने कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. अखेर या प्रकरणात काहीतरी अनुचित घडल्याची खात्री पटल्यानंतर मुलीच्या पालकांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

​या दुर्दैवी आणि गंभीर घटनेबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २२५/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अन्वये अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलींचे अपहरण किंवा त्यांना फुस लावून पळवून नेण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास महिला पोलीस अंमलदार पूजा कांबळे यांच्याकडे सोपवण्यात आला असून, पोलीस पथके मुलीचा आणि तिला पळवून नेणाऱ्या अज्ञात आरोपीचा माग काढण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करत आहेत.

Comments

Popular posts from this blog