मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 लोणेरे येथील निर्घृण हत्याकांडातील मुख्य सूत्रधार अखेर जेरबंद! रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मुंब्र्यात धाडसी कारवाई 🚨

शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडक कारवाई; अवैध शस्त्र बाळगणाऱ्याला अटक!
देशी बनावटीचे पिस्टल आणि काडतूस जप्त


सातारा, दि. २७ (रणजीत मस्के) :- सातारा जिल्ह्यात विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. या मोहिमेतंर्गत शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने एका युवकाला देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतुसासह जेरबंद करून मोठी कारवाई केली आहे.

​या कारवाईबाबत सविस्तर माहिती अशी की, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना त्यांच्या खास गोपनीय बातमीदारामार्फत एक महत्त्वाची माहिती मिळाली. मोळाचा ओढा, सातारा येथील राजपुरोहित दुकानासमोर एक संशयित इसम उभा असून त्याच्याकडे पिस्टलसारखे अग्नीशस्त्र असल्याची माहिती मिळाल्याने, म्हेत्रे यांनी तातडीने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे व त्यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन संशयित इसमाची ओळख पटवली. पोलिसांनी पाहताच तो संशयित पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, मात्र सतर्क असलेल्या पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

​पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव हर्षल सुनील भोसले (वय २० वर्षे, रा. आझादनगर, शाहूपुरी, सातारा) असे असून, त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ६५ हजार ५०० रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून हर्षल भोसले याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बागवान करत आहेत.

​सदरची यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे, पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, रोहित बाजारे आणि विशाल धुमाळ यांनी केली आहे. या कारवाईमुळे परिसरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Comments

Popular posts from this blog