मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

रोहा-नागोठणे मार्गावरील पडम गावाजवळ इंडस टॉवरचे ट्रान्सफॉर्मर फोडले
 ८८ हजारांची तांब्याची तार लंपास 




​रोहा, दि. २ (प्रतिनिधी) :- रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, नुकतीच एक चोरीची घटना उघडकीस आली आहे.  पडम गावच्या हद्दीत असलेल्या एका मोबाईल टॉवरच्या ट्रान्सफॉर्मरमधून अज्ञात चोरट्यांनी हजारो रुपयांची तांब्याची तार चोरून नेली आहे. याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, रोहा-नागोठणे मार्गालगत पडम गावच्या हद्दीत मिथुन पोकळे यांच्या मालकीची जागा आहे. या जागेत 'इंडस टॉवर कंपनी लिमिटेड'चा मोबाईल टॉवर उभा असून, या टॉवरला वीज पुरवठा करण्यासाठी त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले होते. हे ट्रान्सफॉर्मर सध्या बंद स्थितीत होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी २१ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री १२:०० वाजेपासून ते ३१ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री १२:०० वाजेच्या दरम्यान या ट्रान्सफॉर्मरवर डल्ला मारला.

​चोरट्यांनी मोठ्या शिताफीने हे ट्रान्सफॉर्मर फोडून त्यामधील तांब्याची वायडिंगची तार चोरली. चोरीला गेलेल्या या तांब्याच्या तारेची एकूण किंमत अंदाजे ८८,००० रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीच्या मालकीची ही मालमत्ता फिर्यादीच्या संमतीशिवाय आणि लबाडीच्या उद्देशाने चोरून नेल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.

​या चोरीच्या घटनेबाबत रोहा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ७९/२०२६ नुसार दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार सचिन निळकंठ हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

Comments

Popular posts from this blog