मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

अहिल्यानगर एमआयडीसीतील गोदरेज कंपनीच्या मालाची अफरातफर करणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद


अहिल्यानगर (प्रतिनिधी) :- ​अहिल्यानगर येथील एमआयडीसी परिसरातील गोदरेज कंपनीच्या मालाची अफरातफर करून त्याची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने जेरबंद केले आहे. याप्रकरणी फिर्यादी वैभव चंद्रकांत मचाले यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १ जानेवारी २०२६ ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत वडगाव गुप्ता शिवारातील गोडाऊनमधून गोदरेज कंपनीचे व्हॅन सेल्स रिप्रेझेन्टेटिव्ह अंबादास शंकर दराडे आणि वाहन चालक देविदास तुकाराम साबळे यांनी २,७७,३११ रुपये किमतीच्या मालाची स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने विल्हेवाट लावली होती. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०६, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​जिल्ह्यातील गुन्ह्यांमधील फरार आणि पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले होते. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांच्या नेतृत्वाखाली सुरेश माळी, विष्णू भागवत, फुरकान शेख, सागर ससाणे, सोनल भागवत आणि भगवान धुळे यांचे एक विशेष पथक तयार केले. तपास सुरू असताना तांत्रिक कौशल्य आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी देविदास साबळे हा त्याच्या घरी असल्याची खात्री पटली. पथकाने सांगवी खुर्द येथे छापा टाकून अंबादास शंकर दराडे (वय २८ वर्ष, रा. सांगवी खुर्द, ता. पाथर्डी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदाराबद्दल माहिती दिली. त्यानंतर पथकाने शेकटे गावातून देविदास तुकाराम साबळे (वय २६ वर्ष, रा. शेकटे, ता. पाथर्डी) याला देखील ताब्यात घेतले.

​पोलीस कोठडीत असताना दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पूर्ण केली असून, एमआयडीसी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Comments

Popular posts from this blog