मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

महाडमध्ये गुरु-शिष्य नात्याला काळिमा!
खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण
 महाड शहर पोलिसांत गुन्हा दाखल 



​महाड, दि. ५ (प्रतिनिधी) :- विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या शिक्षण क्षेत्रातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना महाड शहरात समोर आली आहे. आपल्याकडे ज्ञानाचे धडे गिरवण्यासाठी येणाऱ्या एका १० वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याचे एका नराधम शिक्षकाने वारंवार लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी शिक्षकाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण शहरात या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

​या घटनेची सविस्तर माहिती अशी की, पीडित मुलगा हा इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेत असून तो महाड येथील एका खासगी शिकवणी वर्गात (ट्युशन) जात होता. पीडित बालक जेव्हा जेव्हा क्लासला जात असे, तेव्हा आरोपीने त्याच्यावर वाईट नजर ठेवून अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली होती. आरोपीने आपल्या पदाचा आणि मुलाच्या निरागसतेचा गैरफायदा घेत वेळोवेळी मुलाच्या गुप्तांगाला स्पर्श करून अश्लील चाळे केले.

​घटनेचे गांभीर्य अधिक वाढले जेव्हा सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आरोपीने सर्व मर्यादा ओलांडल्या. क्लास सुरू असताना किंवा इतर वेळी आरोपीने पीडित बालकाला जबरदस्तीने घट्ट मिठी मारून विचित्र पद्धतीने स्पर्श केला. इतकेच नव्हे तर, आरोपीने या मुलाला क्लासच्या वर असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील आपल्या वैयक्तिक बेडरूममध्ये नेले. तिथे त्याने मुलाला जबरदस्तीने बेडवर झोपवून, त्याच्या अंगावर झोपून आणि त्याचे कपडे काढून अश्लील कृत्य केले. या सततच्या त्रासामुळे आणि लैंगिक शोषणामुळे पीडित बालक प्रचंड मानसिक दडपणाखाली होता.

​अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून आणि धैर्याने पीडित बालकाने आपल्यासोबत घडलेला हा भीषण प्रसंग उघड केला. या तक्रारीनंतर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७/२०२६ नुसार, बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) अधिनियम २०१२ चे कलम ४, ८, १० आणि १८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. वालकोळी हे करत असून, आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका शिक्षकानेच विद्यार्थ्यासोबत असे घृणास्पद कृत्य केल्याने पालकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Comments

Popular posts from this blog