मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

भरधाव टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल
कुहीरे गावच्या हद्दीत रिलायन्स कंपनीजवळ अपघात


​नागोठणे (प्रतिनिधी) :- नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कुहीरे गावच्या परिसरात एका भरधाव थ्री व्हीलर टेम्पोने पादचाऱ्याला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला असून, पोलीसांनी याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पेण तालुक्यातील कुहीरे गावच्या हद्दीत रिलायन्स कंपनीजवळ हा अपघात झाला. एम एच ०५ एफ डब्ल्यु ०९९५ या क्रमांकाच्या थ्री व्हीलर टेम्पोवरील चालकाने आपले वाहन अतिशय वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून रस्त्याने पायी जाणाऱ्या एका इसमास पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, संबंधित पादचाऱ्याला शरीराच्या विविध भागांवर लहान-मोठ्या स्वरूपाच्या गंभीर जखमा झाल्या. दुर्दैवाने या अपघातातील जखमांची तीव्रता अधिक असल्याने पादचाऱ्याच्या मृत्यूस हा चालक कारणीभूत ठरला आहे.

​या घटनेची माहिती मिळताच नागोठणे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६९/२०२६ नुसार आरोपी चालकावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६(१), २८१, १२५(A), १२५(B) सह मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार पाटील हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. भरधाव वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे परिसरातून चिंता व्यक्त केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog