मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

१३ महिन्यांच्या चिमुकलीचा चुलत्याकडून खून
२४ तासांत गुन्ह्याचा उलगडा; आरोपी तामलवाडी पोलीसांचे ताब्यात


धाराशिव वृत्त (रणजीत मस्के) :- तामलवाडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक २८ फेब्रुवारी रोजी महादेव माने (रा. गवळेवाडी) यांनी आपल्या १३ महिन्यांच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने घरातून पळवून नेल्याची तक्रार दिली. सदर तक्रारीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २९/२०२६ कलम १३७(२) बी. एन. एस. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर करीत असताना, गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पीडित मुलीला तिचा चुलता शंकरेश्वर माने यानेच पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संशयितास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने दिनांक २७ फेब्रुवारी रोजी पहाटे अंदाजे ५:०० ते ५:३० वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीला घरातून उचलून नेले. शेतात तिचा गळा दाबून खून केला व त्यानंतर कोयत्याच्या सहाय्याने मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरून जवळील चारीमध्ये पुरून टाकले, असे त्याने सांगितले. आरोपीने दिलेल्या माहितीवरुन दोन पंचांसमक्ष पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, आरोपीच्या भावाची पत्नीचे अनैतिक संबध परपुरुषासोबत असल्याचे कारणावरून त्याच्या मनात संताप होता. तसेच, पीडित मुलगी आपल्या भावाची नसल्याचा संशय त्याला आल्याने रागाच्या भरात त्याने सदर कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदर गुन्ह्याचा तपास  पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफाकत आमना  व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख  यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर, पोलीस हवालदार जुबेर काझी, आकाश सुरनर, नितीन भोसले, पोलीस अंमलदार सूरज नरवडे, नझीर बागवान, उमेश माने व तुराब शेख, मनोज गोबाडे यांच्या पथकाने २४ तासांच्या आत उलगडला आहे.

Comments

Popular posts from this blog