मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

रोह्यात सहा वर्षांच्या बालिकेशी बालविवाह करून अत्याचार

 रोहा तालुक्यातील घटना 





​रोहा, दि. २६ (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. केवळ ६ वर्षे ११ महिने वय असलेल्या एका अल्पवयीन बालिकेला फुस लावून, तिच्याशी बळजबरीने बालविवाह करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला रोहा पोलिसांनी अटक केली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, १ मे २०२४ ते २५ मार्च २०२६ या प्रदीर्घ कालावधीत हा गुन्हा घडला. मुचणे आदिवासीवाडी येथील रहिवासी असलेल्या आरोपीने पीडित मुलगी अत्यंत अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिला विविध प्रलोभने दाखवून जाळ्यात ओढले. पीडितेच्या आई-वडिलांचा या संबधाला सक्त विरोध असतानाही, आरोपीने पीडितेची दिशाभूल करून तिला मौजे विरझोली येथील धावीर मंदिरात नेले. तिथे देवाच्या समक्ष तिच्या गळ्यात हार घालून त्याने बेकायदेशीरपणे बालविवाह उरकला.

​विधीबाह्य विवाह केल्यानंतर आरोपीने पीडितेवर स्वतःच्या राहत्या घरी नेऊन तिला नांदवण्यास सुरुवात केली. या कालावधीत त्याने पीडितेच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर वेळोवेळी शारीरिक अत्याचार केले. या अमानवी अत्याचारामुळे अवघ्या सात वर्षांच्या उंबरठ्यावर असलेली ही चिमुरडी गर्भवती राहिली, त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

​याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२)(आय), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) कलम ४, ६, ८, १२ आणि बालविवाह प्रतिबंध अधिनियम कलम ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहा पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपीला २५ मार्च २०२६ रोजी रात्री २१:१५ वाजता अटक केली आहे. या गंभीर गुन्ह्याचा पुढील सखोल तपास परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक (IPS) सुयश कुमार सिंह हे स्वतः करीत आहेत. 


टीप :- बातमीतील घटनेच्या चांगल्या सादरीकरणासाठी (Presentation) आणि ग्राफिक्ससाठी AI (Artificial intelligence) तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.


Comments

Popular posts from this blog