मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

धुलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर कल्याण परिमंडळ ३ परिसरात कडक बंदोबस्त 

 शांततेत सण साजरा करण्याचे आवाहन 

कल्याण वृत्त (रणजीत मस्के) :- धुलिवंदन सण शांततेत व उत्साहात पार पडावा यासाठी श्री. अतुल झेंडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण यांनी बंदोबस्ताचा सविस्तर आढावा घेतला.

धुलिवंदनाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांनी सुरक्षित वातावरणात सण साजरा करावा यासाठी पोलीसांकडून व्यापक नियोजन करण्यात आले आहे. संवेदनशील ठिकाणी विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे व सार्वजनिक भागात गस्त वाढविण्यात आली आहे. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात वाहतूक विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात आली असून शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.

नागरिकांनी सण साजरा करताना कायद्याचे पालन करावे, शांतता राखावी तसेच कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog