मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨
जुन्नरमध्ये गोडाऊन फोडून तांब्याचे हांडे चोरणारी महिलांची टोळी जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई






जुन्नर-पुणे ग्रामीण वृत्त (रणजीत मस्के) :- जुन्नर शहरातील महाजन आळी येथील व्यावसायिक आनंद हेमंत सासवडे यांचे भांड्यांचे गोडाऊन अज्ञात चोरट्यांनी फोडून तांब्याचे हांडे लंपास केल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ७१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४), ३०५(अ) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. २० मार्च २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास झालेल्या या धाडसी चोरीत चोरट्यांनी गोडाऊनमधून एकूण ९० तांब्याचे हांडे चोरून नेले होते. तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची सखोल पाहणी केली असता, काही महिला गोडाऊनमधून हांडे चोरून नेत असल्याचे स्पष्ट झाले.


पोलिसांनी रचला कुरण फाट्यावर सापळा; ५५ हांड्यांसह १ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, या चोरीत पंचलिंग वस्ती येथील सारिका बबन मकवाने, अंजली सुरज वाघमारे आणि सुरेखा राजू वालेकर या महिलांचा समावेश असल्याचे समजले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुरण फाटा येथे सापळा रचून या तिन्ही महिलांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या ९० हांड्यांपैकी १,३७,५०० रुपये किमतीचे ५५ तांब्याचे हांडे जप्त केले आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

Comments

Popular posts from this blog