मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
🚨 सातारा : पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांची तासगांव (जि. सांगली) येथून सातारा जिल्ह्यात बदली... 🚨 पुणे शहर वाहतूक विभागातर्फे मॉडीफाईड सायलेंसर असणाऱ्या बुलेट मोटारसायकल विरोधात मोहीम, ३४८ बुलेट मोटारसायकलवर कारवाई... 🚨 सोलापूर : खुळेवाडी, ता. माळशिरस येथे तळहातावर सुसाईड नोट लिहून नवविवाहितेची गळफास लावून आत्महत्या; पती, दिर, सासू, सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल... 🚨 जालना : आंतरराज्य घरफोडी करणारा कुख्यात गुंड रवी शिंदे पोलीसांच्या जाळ्यात...🚨 भंडारा : बाळ विक्री प्रकरण - ४ लाख ७० हजारांचा सौदा, डॉ. नितेश वाजपेयी यांच्यासह साथीदारांना अटक...🚨

'ब्युटी पार्लर माझा जीव होता...' तळहातावर सुसाईड नोट लिहून नवविवाहितेची आत्महत्या!
पती, दिर, सासू, सासरा यांच्यावर गुन्हा दाखल

सोलापूर जिल्हा वृत्त (संभाजी पुरीगोसावी) :- सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून एक दुर्दैवी बातमी नुकतीच समोर आली आहे. यामध्ये सासरकडील मंडळींकडून शारीरिक मानसिक त्रास होत असल्याने 22 वर्षीय नवविवाहितेने तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. पायल शशिकांत रणदिवे (रा. खुळेवाडी ता. माळशिरस) असे या नवविवाहितेचे नाव आहे. ब्युटी पार्लर बंद करण्यासाठी सासरकडील लोकांकडून त्रास होत होता, असे तिने मृत्यूपूर्वी आपल्या तळहातावरील सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. याप्रकरणी पोलीसांनी पती शशिकांत मारुती रणदिवे, सासू छाया मारुती रणदिवे, सासरा मारुती दामू रणदिवे, यांना अटक केली आहे. तर दिर कैलास मारुती रणदिवे याचा पोलीस शोध घेत आहेत. गुन्हा दाखल करण्यापूर्वी नातेवाईकांनी पायलचा मृतदेह नातेपुते पोलीस ठाण्यात आणला. गुन्हा दाखल झाल्यानंतर तिच्या माहेरच्यांनी तिचा मृतदेह घरी नेला. याबाबत अंकुश रामचंद्र लोंढे (रा. बाबरीपुल महाळुंग ता. माळशिरस) यांनी फिर्याद दिली आहे. पायलच्या शरीरांवर मारहाणीच्या खुणा आहेत. त्यामुळे ही आत्महत्या नाही तर ही हत्या असल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. पायलने आपल्या तळहातावर सुसाईड नोटमध्ये पायल ने मृत्यूपूर्वी हसू झालं ग माझं, माझं पार्लर बंद केलं, जीव होता तो माझा... स्वप्न होतं ग... आजपर्यंत शांत बसले. पण आता नाही चांगल्या आई-बापाची लेक आहे. म्हणून निघून पण नाही गेले. माझ्यामुळे त्रास झाला त्यासाठी मी माफी मागते. सॉरी. पायलच्या आत्महत्येमुळे नातेपुते परिसरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर करीत आहेत. मात्र या प्रकरणात आणखीन कोणती माहिती समोर येणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog