मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
🚨 सातारा : पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांची तासगांव (जि. सांगली) येथून सातारा जिल्ह्यात बदली... 🚨 पुणे शहर वाहतूक विभागातर्फे मॉडीफाईड सायलेंसर असणाऱ्या बुलेट मोटारसायकल विरोधात मोहीम, ३४८ बुलेट मोटारसायकलवर कारवाई... 🚨 सोलापूर : खुळेवाडी, ता. माळशिरस येथे तळहातावर सुसाईड नोट लिहून नवविवाहितेची गळफास लावून आत्महत्या; पती, दिर, सासू, सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल... 🚨 जालना : आंतरराज्य घरफोडी करणारा कुख्यात गुंड रवी शिंदे पोलीसांच्या जाळ्यात...🚨 भंडारा : बाळ विक्री प्रकरण - ४ लाख ७० हजारांचा सौदा, डॉ. नितेश वाजपेयी यांच्यासह साथीदारांना अटक...🚨

उच्चभ्रु सोसायटी मध्ये विनापरवाना चालू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर छापा
सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांची धडक कारवाई

पुणे, दि. १२ (रणजीत मस्के) :- पुणे शहरात उच्चभ्रु सोसायटीत विनापरवाना चालू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर सहकारनगर पोलीसांनी छापा टाकून कारवाई केली.
सहकारनगर पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत गुलाबनगर चौकात आले असताना पोलीस हवालदार अमोल पवार यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, राजमुद्रा हौसींग सोसायटीतील मेहेर लिव्हींग बिल्डींग शेजारील श्री. गुरु नानक कृपा बिल्डींगमधील तिसरे मजल्याचे टेरेसवर धनकवडी पुणे येथे अवैध हुक्का पार्लर विनापरवाना चालु आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे यांना कळविली. त्यांनी सदरची बातमी सहकारनगर पोलीस स्टेशन कडिल वरिष्ठ पालीस निरीक्षक श्री. विठ्ठल पवार यांना कळविली असता त्यांनी तातडीने तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांची टीम तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार सहकारनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी राजमुद्रा हौसींग सोसायटीतील मेहेर लिव्हींग बिल्डींग शेजारील श्री. गुरु नानक कृपा बिल्डींगमधील तिसऱ्या मजल्याच्या टेरेसवर धनकवडी पुणे येथे प्रवेश करून जिन्याने टेरेसवर जाऊन तेथील लाकडी दरवाजा तोडुन बातमीचे ठिकाणी जाऊन छापा टाकला असता हॉलमध्ये एकुण ६ टेबल मांडलेले दिसले. त्यामधील ४ टेबलवर ८ इसम हुक्का फ्लेवरचे सेवन करताना मिळून आले. काऊंटरवर हजर असलेल्या इसमाकडे याबाबत चौकशी केली असता तेथे हॉटेल मालक व वेटर हे मिळून आले. त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता हॉटेल मालकाने त्याचे नाव १) राजसिंग भजनसिंग गोरोवाडा वय ३५ वर्षे राजमुद्रा सोसायटी धनकवडी पुणे २) पारस परमानंद शर्मा वय २४ वर्षे रा. सदर मुळ रा. नेपाळगंज जि बाके नेपाळ ३) सुबाष मानसिंग गिरी वय २० वर्षे रा. सदर मुळ रा. कंचनपुर जि. बिलोरी नेपाळ ४) तिलक भोला तिवारी वय ३५ वर्षे रा. सदर मुळ रा. टिकापुर जि. कैलानी नेपाळ ५) नारायण मेघे आचार्य वय ३४ वर्षे रा. सदर मुळ रा. टिकापुर जि. कैलानी नेपाळ अशी असल्याचे सांगितले. हॉटेलच्या किचनची पाहणी केली असता तेथे विविध फ्लेवरचे हुक्का भरलेले चिलीमसह टेबलवर मिळून आलेले हुक्का पॉट व साहित्य तसेच किचनमधील विविध फ्लेवरचे हुक्का भरलेले चिलीम मिळून आल्याने सदरचा १२,४९५/- रू. किंमतीचा माल पंचांसमक्ष जप्त करुन त्यांच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ४३/२०२६, भारतीय न्यायसंहीता २०२३ चे क. १२३, ३(५) तसेच सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे क. ४ अ. २१ (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेश बनसोडे मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्री. मिलींद मोहीते, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग श्री. धन्यकुमार घोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. मनोजकुमार लोंढे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे, सद्दामहुसेन फकीर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड, व पोलीस अंमलदार अमोल पवार, निलेश शिवतरे, किरण कांबळे, बजरंग पवार, सागर सुतकर, आशिष ढमाळ, निखील राजीवडे, अभिजीत वालगुडे, महेश भगत, आकाश किर्तीकर, खंडु शिंदे, अभिमान बागलाने, अमित पदमाळे, मारोती नलवाड, रफीक तडवी यांनी केली.



Comments

Popular posts from this blog