मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
🚨 सातारा : पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांची तासगांव (जि. सांगली) येथून सातारा जिल्ह्यात बदली... 🚨 पुणे शहर वाहतूक विभागातर्फे मॉडीफाईड सायलेंसर असणाऱ्या बुलेट मोटारसायकल विरोधात मोहीम, ३४८ बुलेट मोटारसायकलवर कारवाई... 🚨 सोलापूर : खुळेवाडी, ता. माळशिरस येथे तळहातावर सुसाईड नोट लिहून नवविवाहितेची गळफास लावून आत्महत्या; पती, दिर, सासू, सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल... 🚨 जालना : आंतरराज्य घरफोडी करणारा कुख्यात गुंड रवी शिंदे पोलीसांच्या जाळ्यात...🚨 भंडारा : बाळ विक्री प्रकरण - ४ लाख ७० हजारांचा सौदा, डॉ. नितेश वाजपेयी यांच्यासह साथीदारांना अटक...🚨

धारदार लोखंडी हत्याराने दोन इसमांवर हल्ला करुन कारच्या काचा फोडून दहशत 

सिंहगड रोड पोलीसांची धडक कारवाई! 

 ४ आरोपींना ठोकल्या बेड्या 

पुणे वृत्त, दि. १३ फेब्रुवारी (संभाजी पुरी गोसावी) :- सदर बाबत अधिक माहिती अशी की, सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८:२० वा. च्या सुमारास महालक्ष्मी मंदीराच्या समोर, पीएमसी शाळेजवळ, वडगाव बुगा, पुणे येथे पाच ते सहा अनोळखी इसमांनी येऊन, सफेद रंगाची सुझुकी फ्रॉन्क्स कारच्या काचा फोडून, तसेच कारमधील दोन इसमांवर धारदार लोखंडी हत्याराने हमला करुन गंभीर जखमी करुन, सदर परीसरात दहशत निर्माण केली होती. सदर घटनेच्या अनुषंगाने सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. ४७/२०२६ भारतीय न्याय संहिता क ११८(२), ३२४(४), १८९(२), १८९ (४), १९०, १९१ सह शस्त्र अधि. कलम ४, २५ सह म. पो. अ. कलम ३७ (१), ३७ (३), १३५ सह फौजदारी कायदा (सुधारणा) कायदा २०१३ चे कलम ७ अन्वये तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर दाखल गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनय पाटणकर यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशनकडील तपास पथक अधिकारी व अंमलदार यांना गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाबाबत योग्य त्या सूचना देऊन आरोपींचा तातडीने शोध घेण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार तपास पथक अधिकारी व अंमलदार यांनी घटनेच्या ठिकाणाचे व आरोपीतांचे येण्या-जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पडताळणी करुन आरोपी १) अमन अंबीर झारेकरी, वय २२ वर्षे पत्ता- रुम नं. २०२, महालक्ष्मी बिल्डींग, सर्व्हे नं. १३२, दांडेकर पुल, सिंहगड रोड, पुणे २) निशांत राजेश राऊत, वय २४ वर्षे, पत्ता चाळ नं. ए ३५ खोली नं. ६. महाडीक चाळ, २७६ अप्पर ओटा, अप्पर इंदिरा नगर, बिबवेवाडी, पुणे १) सुमित अनिल माने, वय २२ वर्षे, रा. १५ नं. चौक, जिजामाता वसाहत, गृहवस्ती, हडपसर, पुणे व ४) स्वप्निल चंद्रकांत गायकवाड, वय २० वर्षे पत्ता स्वराज मित्र मंडळ, २७६ अप्पर ओटा, बिबवेवाडी, पुणे असे ०४ आरोपीत यांना अटक करण्यात आले व ०१ विधीसंघर्षग्रस्त बालक यास ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच सदर आरोपी यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेले एक दुचाकी वाहन व तिन लोखंडी धारदार हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोउपनि/भुपेश साळुंके करीत आहेत.
सदरची कामगीरी मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, कारवाई मा. श्री. रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. राजेश बनसोडे अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर मा. श्री. संभाजी कदम, पोलीस उप आयुक्त साो, परिमंडळ ३, पुणे शहर, मा. श्री. अजय परमार सहाय्यक पोलीस आयुक्त सोो, सिंहगड रोड विभाग, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन यांच्या सुचनेनुसार सदरची कामगारी पोउपनि/संतोष भांडवलकर, पोउपनि/भुपेश साळुंखे, पोहवा अण्णा केकान, उत्तम तारू, विकास बांदल पोलीस अंमलदार राहुल ओलेकर, सागर शेडगे, विनायक माहिते, सतीश मोरे, समीर माळवदकर, ज्ञानेश्वर डाके यांनी केली आहे.


Comments

Popular posts from this blog