विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर हद्दीतील अनाधिकृत आस्थापनांवर कारवाई
पुणे वृत्त, दि. १३ फेब्रुवारी (रणजीत मस्के) :- विमानतळ पोलीस स्टेशनचे हद्दीमधील राहणारे नागरीकांच्या वारंवार अनाधिकृत ठेले, हातगाडया थ फुटपाथवर होणारे अतिक्रमण यामुळे त्रास होत असलेबाबतच्या तक्रारी प्राप्त होत असलयाने दिनांक-१० फेब्रुवारी २०२६ रोजी मा. पोलीस उपआयुक्त परि-०७ पुणे शहर श्री. सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनाखाली परीमंडळामधील ०७ पोलीस निरीक्षक, ०८ सहा. पोलीस निरीक्षक/ पोलीस उप निरीक्षक व ७८ पोलीस अंमलदार यांचे पथकाने ०५ टॅम्पो, ०५ ठेले, १० हातगाडया व ५० इतर साहीत्य जमा करण्यात आलेले असुन एकुण ७० जणांवर विविध कलमांन्वये खटले दाखल करण्यात आलेले आहेत.
तसेच दिनांक- ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पुन्हा वरील प्रमाणे विमानतळ पोलीस स्टेशन व पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे मदतीने ३० पेक्षा जास्त अनाधिकृत फेरीवाले, हातगाडीवाले व पथारीवाले यांचेवर कारवाई करुन ०३ ट्रक साहीत्य उचलण्यात आलेले आहे. सदरची कारवाई ही दत्त मंदीर चौक ते निको गार्डन चौक ते बजाज फिनसर्व्ह, पुणे नागरी विमानतळ ते लॉ कॉलेज चौक ते शुभ गेटवे सोसायटी, मंत्री आयटी पार्क, खराडी बायपास चौक या भागात कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच यापुढे देखील विमानतळ पोलीस स्टेशन मार्फत नियमीत अनाधिकृत हातगाडी, फेरीवाले, पथारीवाले व फुटपाथवर ठेले लावणारे विक्रेते आढळून आल्यास यांचेवर कारवाई सुरु राहणार आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ ०७ पुणे शहर, श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग पुणे शहर, श्री. नुतन पवार यांच्या आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर श्री.गोविंद जाधव यांचे मार्गदर्शनाखाली ०७ पोलीस निरीक्षक, ०८ सहा. पोलीस निरीक्षक/पोलीस उप निरीक्षक व ७८ पोलीस अंमलदार यांच्या पथकाने केली आहे.

Comments
Post a Comment