नागोठणे बाजारपेठेत प्रतिबंधित गुटख्याची बेकायदेशीर विक्री बालाजी किराणा दुकानावर कारवाई; एकाला अटक रोहा-रायगड, दि. २६ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाने मानवी आरोग्यास अपायकारक ठरणाऱ्या सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रीवर कडक बंदी घातलेली असतानाही, नागोठणे शहरात छुप्या पद्धतीने प्रतिबंधित गुटख्याची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागोठणे बाजारपेठ येथील बालाजी किराणा दुकानामध्ये बेकायदेशीररीत्या साठा करून गुटख्याची विक्री करणाऱ्या एका इसमावर नागोठणे पोलिसांनी धडक कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. नागोठणे पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कोमल बिल्डींग, रूम नंबर २, कोळीवाडा, नागोठणे (ता. रोहा) येथील रहिवासी असलेल्या आरोपीने आपल्या ताब्यातील बालाजी किराणा दुकानात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य गुटखा विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या साठवून ठेवला होता. महाराष्ट्र शासन राजपत्रातील अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या पदार्थांची विक्री, साठा व वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. ...
मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
आंबेवाडी आदिवासीवाडीतून विवाहीत महिला बेपत्ता अज्ञात इसमाविरोधात कोलाड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल रोहा-रायगड, दि. २५ (प्रतिनिधी) :- रोहा तालुक्यातील आंबेवाडी आदिवासीवाडी येथून एक महिला अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या घरातून कोणालाही काही एक न सांगता निघून गेलेल्या या महिलेचा सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून न आल्याने, अखेर अज्ञात इसमाने तिला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, माणगाव तालुक्यातील इंदापूर जवळील रातवड आदिवासीवाडी येथील फिर्यादी यांच्या बहिणीचे लग्न आंबेवाडी आदिवासीवाडी, तालुका रोहा येथे झाले असून ती आपल्या सासरी पती व सासरच्या लोकांसोबत राहत होती. दरम्यान, संबंधित महिला आपल्या राहत्या घरातून कोणासही कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक निघून गेली. बरीच वाट पाहूनही ती परत न आल्याने तिच्या सासरच्या तसेच माहेरच्या मंडळींनी आसपासच्या संपूर्ण परिसरात, ओळखीच्या लोकांकडे, नातेवाईक आणि मित्रपरिवारात तिचा कसून शोध घेतला. मात्र, सर्व ठिकाणी शोध घेऊनही तिचा कुठेही थांगपत्ता लागू श...
बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव रायगड पोलिसांची धडक कारवाई रोहा-रायगड, दि. २४ (प्रतिनिधी) :- भारत देशात बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध रायगड जिल्हा पोलीस दलाने धडक मोहीम हाती घेत अत्यंत प्रभावी आणि उल्लेखनीय कारवाई केली आहे. चालू वर्षात जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत रायगड पोलिसांच्या विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे जिल्ह्यातील वडखळ, पेण, रसायनी, अलिबाग आणि दादर सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी छापे टाकून एकूण १२ बांगलादेशी घुसखोरांचा छडा लावत त्यांना ताब्यात घेतले होते. यानंतर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून, आवश्यक त्या न्यायालयीन व प्रशासकीय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. या मोहिमेअंतर्गत काही बांगलादेशी नागरिकांवर सीमापार कारवाई करण्यासाठी त्यांना होल्डिंग सेंटर पोलीस मुख्यालय रायगड येथे ठेवण्यात आले, तर काहींना कायदेशीर बाबींची पूर्तता करून पुन्हा मूळ देश अस...
रायगड एलसीबीची धडक कारवाई! तिन्ही राज्यांत ६८ गुन्हे नोंद असलेला आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार जेरबंद पोलिसांवर गाडी घालणाऱ्या साथीदाराच्याही आवळल्या मुसक्या! रोहा-रायगड, दि. २५ (प्रतिनिधी) :- नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या घडलेली घरफोडीची गंभीर घटना उघडकीस आणण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. या धडक कारवाईदरम्यान पोलिसांनी आंतरराज्यीय अट्टल गुन्हेगाराला शिताफीने जेरबंद केले असून, त्याच्यावर महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, चोरी, आर्म्स ॲक्ट, कर्नाटक एक्साईज ॲक्ट तसेच खुनाचा प्रयत्न यांसारखे तब्बल ६८ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. याच कारवाईदरम्यान तपास पथकाच्या वाहनाला धडक देऊन पोलिसांच्या अंगावर थेट गाडी घालणाऱ्या त्याच्या दुसऱ्या साथीदारालाही पुणे परिसरातून थरारक पाठलागानंतर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नागोठणे पोलीस ठाण्यात ९ सप्टेंबर २०२६ रोजी घरफोडीचा गुन्हा (गु.र.नं. १८७/२०२६, BNS कलम ३३१(३), ३३१(४), ३०५) दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन स्थानिक गुन्ह...

Comments
Post a Comment