मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
🚨 सातारा : पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांची तासगांव (जि. सांगली) येथून सातारा जिल्ह्यात बदली... 🚨 पुणे शहर वाहतूक विभागातर्फे मॉडीफाईड सायलेंसर असणाऱ्या बुलेट मोटारसायकल विरोधात मोहीम, ३४८ बुलेट मोटारसायकलवर कारवाई... 🚨 सोलापूर : खुळेवाडी, ता. माळशिरस येथे तळहातावर सुसाईड नोट लिहून नवविवाहितेची गळफास लावून आत्महत्या; पती, दिर, सासू, सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल... 🚨 जालना : आंतरराज्य घरफोडी करणारा कुख्यात गुंड रवी शिंदे पोलीसांच्या जाळ्यात...🚨 भंडारा : बाळ विक्री प्रकरण - ४ लाख ७० हजारांचा सौदा, डॉ. नितेश वाजपेयी यांच्यासह साथीदारांना अटक...🚨

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रेम प्रकरणातून मुलीची हत्या

विल्हेवाट लावताना आई-वडील वाळूज पोलीसांच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर (सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी) :- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणि शहरात एकीकडे शिवजयंतीचा उत्सव सुरू असतानाच दुसरीकडे माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या २१ वर्षीय मुलीची हत्या करून तिचे प्रेत गादीत गुंडाळून रिक्षाने विलेवाट लावणाऱ्या आई-वडिलांना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. एका सतर्क रिक्षावाल्यामुळे हा थरार उघडकीस आला आहे. पतीने सोडल्याने आई-वडिलांकडे मुलगी नंदिनी राजू धिंवरे (वय २१) रा. वडगांव कोल्हाटी) असे मयत तरुणीचे नाव आहे. नंदिनीने दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह केला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच पतीने तिला सोडून दिल्याने ती आई भारती साबळे आणि वडील उमेश साबळे यांच्याकडे राहत होती. तेव्हापासून घरात सतत भांडणे होत होती. त्यामुळे या आई-वडिलांनी अखेर मुलीचा शेवट करण्याचे नियोजन आखले होते. मुलीच्या हत्येनंतर तिचा पुरावा नष्ट करण्याचेही त्यांनी नियोजित केले होते. मात्र रिक्षावाल्याची सतर्कता ठरली मोलाची, संध्याकाळी पती उमेश घरी आल्यावर या दांपत्याने पुरावा नष्ट करण्यासाठी मुलीचा मृतदेह गादीत गुंडाळून रिक्षातून प्रवास करून विल्हेवाट लावत असताना या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली होती. तिसगांव फाट्यावर सापळा रचला होता यावेळी पोलिसांनी रिक्षाची पाहणी व गादी उघडून पाहताच त्यात नंदिनीचा मृतदेह आढळून आला. यावेळी मुलीने गळफास घेतला असून अंत्यसंस्कारासाठी गावी चाललो आहोत, अशी बतावणी आई-वडिलांनी केली मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच आई-वडिलांनी हत्येची कबुली दिली. या कारवाईत वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद शिंदे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांच्यासह पोलीस ठाणेकडील पथकांने या कारवाईत सहभाग घेतला. अखेर आई-वडिलांचा बनाव उघडकीस आला. आपल्याच पोटच्या मुलीची हत्या करणाऱ्या आई-वडिलांना वाळूज एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.

Comments

Popular posts from this blog