मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
🚨 सातारा : पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांची तासगांव (जि. सांगली) येथून सातारा जिल्ह्यात बदली... 🚨 पुणे शहर वाहतूक विभागातर्फे मॉडीफाईड सायलेंसर असणाऱ्या बुलेट मोटारसायकल विरोधात मोहीम, ३४८ बुलेट मोटारसायकलवर कारवाई... 🚨 सोलापूर : खुळेवाडी, ता. माळशिरस येथे तळहातावर सुसाईड नोट लिहून नवविवाहितेची गळफास लावून आत्महत्या; पती, दिर, सासू, सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल... 🚨 जालना : आंतरराज्य घरफोडी करणारा कुख्यात गुंड रवी शिंदे पोलीसांच्या जाळ्यात...🚨 भंडारा : बाळ विक्री प्रकरण - ४ लाख ७० हजारांचा सौदा, डॉ. नितेश वाजपेयी यांच्यासह साथीदारांना अटक...🚨
बसस्टॅन्ड रोड वरील वैष्णवी लॉज व मोक्ष लॉज येथे चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलीसांचा छापा 
७ पुरुष आरोपी जेरबंद, १३ पीडीत महिलांची सुटका 
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कार्यवाही 
जालना जिल्हा वृत्त (रणजीत मस्के) :- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षास मिळालेल्या गुप्त बातमी वरून बसस्टैन्ड रोड वरील वैष्णवी लॉज व मोक्ष लॉज येथे लॉज मालक हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांच्या लॉज मधे महिलांना आणून त्यांच्याकडून अनैतिक देहव्यापार करून घेत आहेत यावरून सदर दोन्ही ठिकाणी कारवाई करण्याबाबत मा. पोलीस अधिक्षक सो यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी अधिकारी व स्टाफचे अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी छापा टाकला छापा मारला असता मोक्ष लॉजचे मालक सचिन नंदू पवार वय 30, रा. वाटुर, ता. परतुर, जि. जालना हे मॅनेजर संतोष भोलेनाथ जाधव रा. खरपुडी, ता. जि. जालना याच्यामार्फत तसेच वैष्णवी लॉज चे मॅनेजर कैलास रतन कुमार वय ३० रा. सावा, ता. जि. चित्तोडगड, राज्य - राजस्थान. ह. मु. वैष्णवी लॉज जालना तसेच (ग्राहक) आरोपी नामे वैष्णवी लॉज मध्ये १) पंकज भाऊसाहेब निकाळजे वय २५ वर्ष रा. जांमवाडी, ता. जि. जालना, २) तुषार हरिश बत्रा वय २४ वर्ष रा. परतुर ३) रोहीत संजय बोर्डे वय २६ वर्ष रा. जांमवाडी, ता. जि. जालना, ४) करण रवी वाहुळे वय २० वर्ष रा. जामवाडी, ता. जि. जालना यांच्यासह एकुण १३ पिडीत महिलापैकी पश्चिम बंगाल राज्यातील ६ तसेच आसाम राज्याच्या ३ व छ. संभाजीनगर येथील ४ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आसुन त्याच्या ताब्यात ८१,७५०/-असा मुद्देमाल रोख रक्कम व साहीत्य असे मिळुण आला आहे. त्यानुसार त्यांना ताब्यात घेवून त्यांचे विरुध्द पोलीस ठाणे सदरबाजार येथे महीलांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ कलम ३,४,५,६ प्रमाणे प्रभारी अधिकारी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बंसल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, परि. पोलीस अधिक्षक श्रीमती जान्हवी शेखर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना श्री अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव (स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे, उपनिरीक्षक रवी जोशी, उपनिरीक्षक संजय गवळी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे दिपक घुगे, आक्रुर धांडगे, शुभम राठोड, महिला अंमलदार संगिता चव्हाण, पुष्पा खरटमल, आरती साबळे, चित्रा चव्हाण व चालक पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog