मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
🚨 सातारा : पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांची तासगांव (जि. सांगली) येथून सातारा जिल्ह्यात बदली... 🚨 पुणे शहर वाहतूक विभागातर्फे मॉडीफाईड सायलेंसर असणाऱ्या बुलेट मोटारसायकल विरोधात मोहीम, ३४८ बुलेट मोटारसायकलवर कारवाई... 🚨 सोलापूर : खुळेवाडी, ता. माळशिरस येथे तळहातावर सुसाईड नोट लिहून नवविवाहितेची गळफास लावून आत्महत्या; पती, दिर, सासू, सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल... 🚨 जालना : आंतरराज्य घरफोडी करणारा कुख्यात गुंड रवी शिंदे पोलीसांच्या जाळ्यात...🚨 भंडारा : बाळ विक्री प्रकरण - ४ लाख ७० हजारांचा सौदा, डॉ. नितेश वाजपेयी यांच्यासह साथीदारांना अटक...🚨
मुंबई-गोवा महामार्गावर पेण नजीक लोखंडी कॉईल घेऊन जाणाऱ्या ट्रेलरला अपघात 
 चालक गंभीर जखमी 
अलिबाग-रायगड, दि. ११ (स्वप्निल नाईक) :- वाहन क्रमांक MH46 BU 1359 व MH04 FP 5636 हे दोन्ही ट्रेलर मुंबई–गोवा महामार्गावर मुंबईच्या दिशेने जात असताना पेण जवळील पुलावर व आंतोरे फाट्याच्या अलिकडे भीषण अपघात झाला.
ट्रेलर क्रमांक MH46 BU 1359 हा पुढे जात असताना त्याच्या मागून येणाऱ्या ट्रेलर क्रमांक MH04 FP 5636 ने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दोन्ही ट्रेलरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातात जखमी झालेल्या ट्रेलरचालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या पोलीस प्रशासनाकडून रस्त्यावर झालेला वाहतुकीचा अडथळा दूर करण्याचे काम सुरू असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. 



Comments

Popular posts from this blog