२० तोळे सोने चोरी करून पळणाऱ्या सराईत आरोपीचा सलग सात दिवस चार राज्यांमध्ये पाठलाग करून शिताफीने अटक
नागोठणे बाजारपेठेत प्रतिबंधित गुटख्याची बेकायदेशीर विक्री बालाजी किराणा दुकानावर कारवाई; एकाला अटक रोहा-रायगड, दि. २६ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाने मानवी आरोग्यास अपायकारक ठरणाऱ्या सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रीवर कडक बंदी घातलेली असतानाही, नागोठणे शहरात छुप्या पद्धतीने प्रतिबंधित गुटख्याची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागोठणे बाजारपेठ येथील बालाजी किराणा दुकानामध्ये बेकायदेशीररीत्या साठा करून गुटख्याची विक्री करणाऱ्या एका इसमावर नागोठणे पोलिसांनी धडक कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. नागोठणे पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कोमल बिल्डींग, रूम नंबर २, कोळीवाडा, नागोठणे (ता. रोहा) येथील रहिवासी असलेल्या आरोपीने आपल्या ताब्यातील बालाजी किराणा दुकानात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य गुटखा विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या साठवून ठेवला होता. महाराष्ट्र शासन राजपत्रातील अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या पदार्थांची विक्री, साठा व वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. ...

Comments
Post a Comment