घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करण्यात पालघर पोलीसांना यश
पालघर (प्रतिनिधी) :- पालघर पोलीस ठाणे हद्दित दि.१७ ऑक्टोबर २०२५ रोजी ११.०० वाजता ते १३.०० वाजताचे सुमारास फिर्यादी श्री. मनोज अशोक कापडीया, यय ४४ वर्षे, रा. शेवंती अपार्टमेंट पालघर हे त्यांचे पत्नी सोबत घरगुती सामान खरेदी करण्याकरीता बाजारात गेलेले असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे फ्लॅटच्या दरवाजाचा तोडुन त्यावाटे घरात प्रवेश करुन कपाट उघडुन लॉकर मध्ये ठेवलेल्या स्टिलच्या डब्यातील एकूण ९२,०००/- रु. किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र, चैन व हार असे फिर्यादी यांचे संमतीशिवाय स्वतःच्या आर्थिक फायद्या करीता घरफोडी करून चोरुन नेलेबाबत पालघर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २६७/२०२५ बीएनएस कलम ३३१ (३), ३०५ (अ) प्रमाणे दि. १७/१०/२०२५ रोजी गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता श्री. यतीश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक पालघर यांनी दिवसा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणणेकामी पोलीस निरीक्षक श्री. प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना तपास पथक तयार करुन तपासाबाबत योग्य त्या सुचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकाने पालघर पोलीस ठाणेकडील पोलीस अमंलदार यांचे मदतीने नमुद गुन्हयाचे घटनास्थळ परिसरात तांत्रीक माहिती तसेच गोपनीय बातमीदारांचे मदतीने आरोपीत नामे निलेश अंकुश काळे, वय ५८ वर्षे, व्यवसाय भाजी विक्री, सध्या रा.रूम नं.०३, दत्तराज चाळ, भाटपाडा, विरार पुर्व ता. वसई, जि. पालघर मुळ रा. पाण्याचे टाकीजवळ, गांधीनगर झोपडपट्टी देहूरोड, पिंपरी चिंचवड, पुणे यास निष्पन्न करून त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे कौशल्यपुर्ण रीतीने विचारपूस केली असता त्याने वर नमूद गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच वाडा पोलीस ठाणे गुरनं ३३५/२०२५ बीएनएस कलम ३३१ (३), ३०५ (अ) प्रमाणे दाखल गुन्हा केल्याचेदेखील कबुल केले आहे.
तसेच आरोपी निलेश अंकुश काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा तसेच मुंबई परीसरात एकूण ३४ गुन्हे दाखल आहेत, नमुद आरोपीस पालघर पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. २६७/२०२५ बी.एन.एस. कलम ३०५ (अ), ३३१ (३) प्रमाणे मध्ये अटक करण्यात आले असून पुढील तपास हा पोहवा /१९७ चंद्रकांत सुरुम, नेमणूक पालघर पोलीस ठाणे हे वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक, पालघर श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक, पालघर श्री. विनायक नरळे यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक श्री. प्रदिप पाटील, पोउनि/स्वप्नील सावंतदेसाई, पोहवा/संतोष निकोळे, पोहवा/संदिप सरदार, पोहवा/भगवान आव्हाड, पोहवा/राकेश पाटील, पोअमं/विशाल लोहार, पोअमं/विशाल कडव, पोअमं/वैभव जामदार सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा, पालघर तसेच पोना/भुषण वाघमारे, पोअमं/रुपेश पाटील, नेमणूक सायबर पोलीस ठाणे पालघर आणि मपोअमं/राखी मेस्त्री, सीसीटीएनएस पालघर यांनी पार पाडलेली आहे.

Comments
Post a Comment