मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले; हाशिवरे, ता. अलिबाग येथील इसमाला १० लाखांना फसविले!

अलिबाग (प्रतिनिधी) :-  ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून शासनाकडून आणि पोलीस प्रशासनाकडून याप्रकरणी वारंवार जनजागृती आणि दक्षतेचे आवाहन करण्यात आलेले आहे. पण तरीही ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांनी नवनवीन युक्त्या तयार करून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सुरू ठेवल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार अलिबाग तालुक्यातील हाशिवरे येथे घडला आहे. यासंदर्भात एका महिलेने पोयनाड पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदविल्यावर पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
पोयनाड पोलीस ठाणे हद्दीतील हाशिवरे, मोकल आळी येथील महिला तक्रारदार यांचे पती यांना त्यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्ती ने व्हॉटसअप व्हिडीओ कॉल करुन मी क्राईम ब्रँच मधून बोलतोय आपले आधारकार्ड मुंबई येथे सापडले असून आपण पैशाची अफरातफरीमध्ये गुंतलेले असून आपणांस 1 टक्के कमिशन मिळालेले आहे, म्हणून आपले बँक खाते तपासावे लागेल असे सांगून फिर्यादी यांचे पती व दोन मुले यांना केस मध्ये अडकविण्याची धमकी दिली आणि महिलेचे स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा हाशिवरे बचत खाते रक्कम व एफडी द्वारे रक्कम 9,04,000/- रु. तसेच त्यांचे पती यांचे  स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा हाशिवरे बचत खात्यातून रक्कम 1,10,637/- असे एकुण  10,14,637/- रू. आर.टी.जी.एस. ऑनलाईन लिंक व चेकद्वारे स्विकारुन महिला तक्रारदार व त्यांचे पती यांची दिशाभूल करुन आर्थिक फसवणुक केली.
याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. 135/2025 माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 (2008 चे सुधारणेसह) 66(d), भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(2),204,351(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष जाधव हे करीत आहेत.


Comments

Popular posts from this blog