मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

नागोठणे बाजारपेठेत नेहल किराणा स्टोअर मध्ये बेकायदा गुटखा पकडला; आरोपी हर्षिल अशोक पटेल याला अटक


रोहा (प्रतिनिधी) :- नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत हद्दीत दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी 15:45 वा च्या सुमारास नागोठणे बाजारपेठ येथील नेहल किराणा स्टोअर मध्ये आरोपी हर्षिल अशोक पटेल, रा. आंगार आळी, पो. नागोठणे, ता. रोहा याने मानवी आरोग्यास अपायकारक असलेला महाराष्ट राज्यात प्रतिबंधित तंबाखुजन्य गुटखा विक्रीकरीता बेकायदेशीर बाळगुन तो तंबाखुजन्य पदार्थ मानवी आरोग्यास व त्यावर महाराष्ट शासन राजपत्र असाधारण भाग-4 क अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत  नियम व नियमने 2011 क्र. असुमाअ अधिसुचना 500/7 जुलै 2021 च्या आदेशाने नागरिकांच्या आरोग्यास हानी पोहचविणाऱ्या अधिसुचनेदवारे विक्री व साठा करण्यास प्रतिबंध केलेल्या तसेच मानवी आरोग्यास अपायकारक मालाची विक्री करण्यासाठी स्वत: जवळ बाळगलेल्या स्थितीत मिळून आला व आरोपी क्रमांक 2 याच्याकडून खरेदी केला. सदर गुन्ह्यातील आरोपी नं. 1 हर्षिल अशोक पटेल यास दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी 23:53 वा च्या सुमारास अटक करण्यात आली आहे. यांतील आरोपी क्र. 2 रा. आमटेम हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं.155/2025 भा.दं.वि.क.328, भारतीय न्याय संहिता 123,223, 275,3(5), अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 चे कलम  26(2),26(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. सुरज पाटील हे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog