मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

म्हसळा : जास्त पैसे मिळण्याचे आमीष दाखवून ऑनलाईन फसवणूक

म्हसळा (प्रतिनिधी) :- टेलीग्राम ॲपदवारे वारंवार मॅसेज करून टेलीग्राम टास्कमध्ये वेगवेगळया अकाउंटला पैसे पाठविण्याचे सांगून सदर पैसे वाढवून मिळतील असे आमीष दाखवून म्हसळा येथील इसमाची फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हसळा पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 5 मे 2025 रोजी 10:00 वा ते दि. 7 नोव्हेंबर 2025 रोजी 10:00 वा च्या दरम्यान, फिर्यादी रा. सोनारआळी, म्हसळा यांच्या मोबाइलमध्ये त्यांना अज्ञात आरोपीत याने टेलीग्राम ॲपदवारे वारंवार मॅसेज करून टेलीग्राम टास्क मध्ये यू.पी.आय. आय डी व आर.टी.जी.एस. द्वारे वेगवेगळ्या अकाउंटला पैसे पाठविण्याचे सांगून सदर पैसे वाढवून मिळतील असे फिर्यादी यांना अमीष दाखविले. त्यानंतर फिर्यादी यांनी अमीषाला बळी पडुन आरोपी अज्ञात इसम याने सांगितलेल्या वेगवगळया यु.पी.आय. आय डी व बँक अकाउंटला 12,53,153/-रुपये पैसे पाठविण्यास सांगून फिर्यादी यांची फसवणूक केली.
याबाबत म्हसळा पोलीस ठाणे गुरनं. 087/2025, माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 (2008 चे सुधारणेसह) 66 (d)  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास श्री. उमेश पाटील,  श्रीवर्धन पोलीस ठाणे हे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog