नागोठणे बाजारपेठेत प्रतिबंधित गुटख्याची बेकायदेशीर विक्री बालाजी किराणा दुकानावर कारवाई; एकाला अटक रोहा-रायगड, दि. २६ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाने मानवी आरोग्यास अपायकारक ठरणाऱ्या सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रीवर कडक बंदी घातलेली असतानाही, नागोठणे शहरात छुप्या पद्धतीने प्रतिबंधित गुटख्याची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागोठणे बाजारपेठ येथील बालाजी किराणा दुकानामध्ये बेकायदेशीररीत्या साठा करून गुटख्याची विक्री करणाऱ्या एका इसमावर नागोठणे पोलिसांनी धडक कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. नागोठणे पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कोमल बिल्डींग, रूम नंबर २, कोळीवाडा, नागोठणे (ता. रोहा) येथील रहिवासी असलेल्या आरोपीने आपल्या ताब्यातील बालाजी किराणा दुकानात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य गुटखा विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या साठवून ठेवला होता. महाराष्ट्र शासन राजपत्रातील अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या पदार्थांची विक्री, साठा व वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. ...
मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
Popular posts from this blog
बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव रायगड पोलिसांची धडक कारवाई रोहा-रायगड, दि. २४ (प्रतिनिधी) :- भारत देशात बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध रायगड जिल्हा पोलीस दलाने धडक मोहीम हाती घेत अत्यंत प्रभावी आणि उल्लेखनीय कारवाई केली आहे. चालू वर्षात जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत रायगड पोलिसांच्या विशेष पथकाने गुप्त माहितीच्या आधारे जिल्ह्यातील वडखळ, पेण, रसायनी, अलिबाग आणि दादर सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी छापे टाकून एकूण १२ बांगलादेशी घुसखोरांचा छडा लावत त्यांना ताब्यात घेतले होते. यानंतर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून, आवश्यक त्या न्यायालयीन व प्रशासकीय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. या मोहिमेअंतर्गत काही बांगलादेशी नागरिकांवर सीमापार कारवाई करण्यासाठी त्यांना होल्डिंग सेंटर पोलीस मुख्यालय रायगड येथे ठेवण्यात आले, तर काहींना कायदेशीर बाबींची पूर्तता करून पुन्हा मूळ देश अस...
आंबेवाडी आदिवासीवाडीतून विवाहीत महिला बेपत्ता अज्ञात इसमाविरोधात कोलाड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल रोहा-रायगड, दि. २५ (प्रतिनिधी) :- रोहा तालुक्यातील आंबेवाडी आदिवासीवाडी येथून एक महिला अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या घरातून कोणालाही काही एक न सांगता निघून गेलेल्या या महिलेचा सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून न आल्याने, अखेर अज्ञात इसमाने तिला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, माणगाव तालुक्यातील इंदापूर जवळील रातवड आदिवासीवाडी येथील फिर्यादी यांच्या बहिणीचे लग्न आंबेवाडी आदिवासीवाडी, तालुका रोहा येथे झाले असून ती आपल्या सासरी पती व सासरच्या लोकांसोबत राहत होती. दरम्यान, संबंधित महिला आपल्या राहत्या घरातून कोणासही कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक निघून गेली. बरीच वाट पाहूनही ती परत न आल्याने तिच्या सासरच्या तसेच माहेरच्या मंडळींनी आसपासच्या संपूर्ण परिसरात, ओळखीच्या लोकांकडे, नातेवाईक आणि मित्रपरिवारात तिचा कसून शोध घेतला. मात्र, सर्व ठिकाणी शोध घेऊनही तिचा कुठेही थांगपत्ता लागू श...
वारकऱ्यांच्या नावाला काळीमा फासणारा 'तो' महाराज अद्यापही मोकाट; पीडित महिलेचा न्यायासाठी आक्रोश ! आरोपी सापडत नसल्यास तपास C.I.D. कडे देण्याची आदिवासी संघटनांची मागणी सुकेळीतील ॲट्रॉसिटी प्रकरण रोहा-रायगड, दि. २४ (विशेष प्रतिनिधी) :- रोहा तालुक्यातील सुकेळी येथे लहान मुलांच्या अगदी किरकोळ वादातून एका आदिवासी समाजातील महिलेला बेदम मारहाण करत भररस्त्यात जातीवाचक हीन पातळीवर शिवीगाळ करणाऱ्या तथाकथित वारकरी महाराजासह चौघांवर नागोठणे पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गंभीर गुन्हा दाखल होऊनही मुख्य आरोपी अद्याप मोकाटच आहे. गळ्यात तुळशीची माळ घालून नित्यनेमाने वारी आणि हरिपाठ करणाऱ्या एका व्यक्तीने अशा प्रकारे असहाय्य महिलेवर हिंसक हल्ला करून वारकरी संप्रदायाच्या पवित्र परंपरेला आणि नावाला काळीमा फासला आहे. एकीकडे आरोपी खुलेआम फिरत असल्याने पीडित महिला न्यायासाठी आक्रोश करत असताना, दुसरीकडे स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आरोपी जर नागोठणे पोलिसांना सापडत नसतील तर या संपूर्ण प्रकरणाचा तपास तात्काळ राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवावा, अशी अत्यंत आ...

Comments
Post a Comment