मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रिलायन्स नागोठणे कंपनीसमोर भरधाव कारच्या धडकेत मुंढाणीच्या तरुण कामगाराचा जागीच मृत्यू; सुरक्षा व्यवस्थेच्या ढिसाळपणाविरोधात नागरिकांचा संताप 🚨

पाथरशेत आदिवासीवाडी येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण

कोलाड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमावर गुन्हा दाखल


​कोलाड-रायगड, दि. १३ (प्रतिनिधी) :- रोहा तालुक्यातील कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून कोलाड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, जामगाव हद्दीतील पाथरशेत आदिवासीवाडी येथे राहणाऱ्या फिर्यादी यांची १४ वर्षे ३ महिने व २७ दिवस वयाची अल्पवयीन मुलगी शुक्रवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कोणालाही काही एक न सांगता राहत्या घरातून अचानक निघून गेली. मुलगी घरात आढळून न आल्याने कुटुंबीयांनी तत्काळ तिचा वाडीत, आजूबाजूच्या परिसरात तसेच सर्व नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींकडे कसून शोध घेतला. मात्र तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून आली नाही. त्यामुळे आपल्या अल्पवयीन मुलीला कोणातरी अज्ञात इसमाने कायदेशीर रखवालीतून फूस लावून पळवून नेले असल्याची खात्री पालकांना पटली.

​त्यानंतर कुटुंबीयांनी कोलाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद नोंदवली. दाखल तक्रारीवरून कोलाड पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर १३८/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पथके रवाना करण्यात आली असून, त्या अल्पवयीन मुलीचा तातडीने शोध घेण्यासाठी तपास चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. या घटनेचा पुढील सखोल तपास महिला पोलीस हवालदार वैशाली वारगुडे या करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog