मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

धोकवडे येथील तरुणावर पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


​पोयनाड-रायगड, दि. १ (प्रतिनिधी) :- लग्नाचा बनाव रचून एका महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोडणवाडी मेढेखार येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अलिबाग तालुक्यातील धोकवडे येथील संशयित आरोपीविरोधात फसवणूक व लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, धोकवडे येथील संशयित आरोपीने बोडणवाडी मेढेखार परिसरातील पीडित महिलेशी प्रथम मैत्री केली. त्यानंतर तिच्यावर प्रेम असल्याचे भासवून तिचा विश्वास संपादन केला. एका दिवशी संशयिताने कोणतीही पूर्वकल्पना न देता पीडितेला किहीम समुद्रकिनारी नेले. तेथे त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिचा विवाह झाल्याचा केवळ देखावा व बनाव केला. या विवाहाच्या आधारे आपण पती-पत्नी असल्याचे भासवून आरोपीने संबंधित महिलेच्या राहत्या घरी तिच्या मनाविरुद्ध वारंवार शरीरसंबंध ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
​आपली फसवणूक झाल्याचे आणि केवळ लग्नाचा बनाव करून अत्याचार केले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने अखेर पोयनाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोयनाड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६९ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ९१/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक सरके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog