मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

कर्जत-पनवेल रेल्वे ट्रॅकजवळून पावणेदोन लाखांची तांब्याची केबल लंपास

कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


​कर्जत-रायगड, दि. १२ (प्रतिनिधी) :- कर्जत-पनवेल रेल्वे ट्रॅकवरील वांजळे गावच्या हद्दीत पुलाखाली ठेवण्यात आलेल्या केबलच्या ड्रममधून लाखो रुपयांची तांब्याची तार चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.
​मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्जत ते पनवेल दरम्यान असलेल्या रेल्वे ट्रॅकवर वांजळे गावच्या हद्दीत एक ओव्हरब्रिज आहे. या ओव्हरब्रिजच्या खालील पिल्लर क्रमांक पी-१९ ते पी-२० च्या दरम्यान असलेल्या मोकळ्या जागेत रेल्वे कामासाठी लागणाऱ्या केबलचे मोठे ड्रम ठेवण्यात आले होते. या मोकळ्या जागेचा आणि निर्जनतेचा गैरफायदा घेत अज्ञात चोराने तेथे प्रवेश केला. आरोपीने ड्रममधील मौल्यवान केबलचे तुकडे करून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आणि त्यातील सुमारे १२५ किलो वजनाची तांब्याची तार स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरून नेली. या चोरीस गेलेल्या तांब्याच्या तारेची बाजारभावाप्रमाणे एकूण किंमत सुमारे १ लाख ७५ हजार रुपये इतकी आहे.
​सदर चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी तत्काळ कर्जत पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ३६५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२) आणि ३२४(५) नुसार सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी परिसरातील संशयितांची चौकशी सुरू केली असून या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिषा लटपटे या करत आहेत. भरदिवसा किंवा रात्रीच्या वेळी रेल्वेच्या सुरक्षेशी संबंधित साहित्याची अशा प्रकारे चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून चोराला लवकरात लवकर बेड्या ठोकण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

Comments

Popular posts from this blog