मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

अलिबागमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अवघ्या काही तासांत बेड्या!

अलिबाग पोलिसांची कारवाई


​अलिबाग-रायगड, दि. १ (प्रतिनिधी) :- अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थळ बाजार परिसरामध्ये एका अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग करत लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून अलिबाग पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीविरोधात पोक्सोसह भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अवघ्या काही तासांत अटक केली आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास मौजे थळ बाजार येथील एकविरा देवीच्या समोरील गल्लीतून पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या घराच्या दिशेने जात होती. त्यावेळी आरोपीने तिच्या घराच्या बाजूला असलेल्या गल्लीमध्ये तिचा रस्ता अडवला. आरोपीने पीडित मुलीचा डावा हात अतिशय घट्ट पकडून तिला स्वतःजवळ ओढले आणि तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा उद्देशाने अयोग्य स्पर्श केला. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने एका कागदावर आपला मोबाईल नंबर लिहून तो कागद जबरदस्तीने तिच्या हातात कोंबला आणि आपल्याला फोन करण्यास सांगितले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे मुलगी प्रचंड घाबरली आणि तिने घरी जाऊन घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला.

​या गंभीर प्रकारानंतर पीडितेच्या पालकांनी तात्काळ अलिबाग पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीच्या आधारे अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३९/२०२६ नुसार बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (POCSO) कायदा २०१२ चे कलम १२ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ७५(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवून ३० ऑगस्ट रोजी पहाटे ५:३२ वाजण्याच्या सुमारास आरोपीला बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास महिला पोलीस उपनिरीक्षक दडस या करत आहेत.

Comments

Popular posts from this blog