मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

लिव्ह-इन पार्टनरनेच घरातून लंपास केले साडेएकोणीस लाखांचे दागिने व रोकड

अलिबागमध्ये धक्कादायक घटना


​अलिबाग-रायगड, दि. १ (प्रतिनिधी) :- अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंतनगर परिसरात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेने घरातील कपाटातून तब्बल १९ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून संबंधित महिलेविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग येथील पंतनगर भागातील वेदांत अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावरील रूम नंबर १०२ मध्ये फिर्यादी आणि आरोपी महिला राहत होते. हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे असून एकाच घरात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये वास्तव्यास होते. दरम्यान, फिर्यादी काही कामानिमित्त घराबाहेर गेले असताना आरोपी महिलेने संधी साधून स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या हेतूने घरातील कपाट चावीने उघडले. कपाटात ठेवलेली रोख रक्कम आणि मौल्यवान सोन्याचे दागिने असा एकूण १९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल तिने चोरून नेला.

​फिर्यादी घरी परतल्यानंतर कपाटातील सर्व ऐवज गायब असल्याचे आणि महिलाही घरात नसल्याचे लक्षात आले. आपली मोठी चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी थेट अलिबाग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे अलिबाग पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५(अ) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक हंबीर करत आहेत.

Comments

Popular posts from this blog