मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

पोलादपूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार

आरोपीविरोधात गुन्हा दाखल


​पोलादपूर-रायगड, दि. २६ (प्रतिनिधी) :- पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी आरोपीविरोधात पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सडवली आदिवासीवाडी येथे राहणाऱ्या पीडित मुलीच्या घरी हा प्रकार घडला असून पीडिता अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही आरोपीने तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकारामुळे पीडित मुलगी तब्बल नऊ महिन्यांची गरोदर राहिल्याची बाब समोर आली आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, १ मे २०२४ रोजी रात्री ८:०० वाजल्यापासून ते २४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८:०० वाजेच्या कालावधीत पोलादपूरमधील सडवली आदिवासीवाडी येथे पीडितेच्या राहत्या घरी हा गंभीर प्रकार घडत होता. पीडित मुलगी ही अवघ्या १७ वर्षे, ८ महिने आणि ६ दिवसांची म्हणजेच अल्पवयीन आहे हे ठाऊक असतानाही दापोली तालुक्यातील वडवली आदिवासीवाडी येथील रहिवासी असलेल्या आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. वारंवार घडलेल्या या प्रकारामुळे पीडिता ९ महिन्यांची गरोदर राहिली. या संपूर्ण प्रकरणाची वाच्यता झाल्यानंतर पीडितेच्या वतीने पोलादपूर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद नोंदवण्यात आली आहे.

​पीडितेच्या तक्रारीवरून पोलादपूर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ३४१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या या अत्याचाराच्या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार करत आहेत.

Comments

Popular posts from this blog