मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

निजामपूर नाका परिसरातील गजानन अपार्टमेंट येथून दुचाकीची चोरी!

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल


​माणगाव-रायगड, दि. १९ (प्रतिनिधी) :- माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत असून, निजामपूर नाका परिसरातील गजानन अपार्टमेंट येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

​याबाबत उपलब्ध माहितीनुसार, निजामपूर नाका, ता. माणगाव येथील रहिवासी असलेल्या फिर्यादी यांनी आपली सुमारे सात हजार रुपये किमतीची मोटारसायकल गजानन अपार्टमेंट परिसरामध्ये पार्क करून ठेवली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लबाडीच्या हेतूने फिर्यादीची कोणतीही संमती नसताना सदर दुचाकी चोरून नेली. फिर्यादीने आपल्या वाहनाचा आसपासच्या परिसरात शोध घेतला असता गाडी मिळून आली नाही. अखेर चोरीचा प्रकार स्पष्ट झाल्यानंतर फिर्यादी यांनी तात्काळ माणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली.

​या तक्रारीच्या आधारे माणगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २३८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (भा.न्या.स.) कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मंदार लहाने यांच्याकडे सोपवण्यात आला असून, पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे अज्ञात चोरट्याचा कसून शोध घेत आहेत.

Comments

Popular posts from this blog