मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

कोंढाणे लेणी परिसरात हरवलेल्या दोन महिला पर्यटकांची रायगड पोलिसांनी केली सुखरूप सुटका!

 डायल ११२ चा तत्पर प्रतिसाद 


​रायगड, दि. १६ (विशेष प्रतिनिधी) :- ऐतिहासिक व निसर्गरम्य कोंढाणे लेणी परिसरात पर्यटनासाठी आल्यानंतर वाट चुकून जंगलात हरवलेल्या दोन महिला पर्यटकांची रायगड पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने यशस्वी व सुरक्षित सुटका केली आहे. 'डायल ११२' या आपत्कालीन मदत प्रणालीवर प्राप्त झालेल्या संदेशाची तातडीने दखल घेत पोलिसांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली.

​दिनांक १५ ऑगस्ट रोजी दोन महिला पर्यटक कर्जत तालुक्यातील कोंढाणे लेणी परिसरात भ्रमंतीसाठी आल्या होत्या. मात्र लेणीच्या घनदाट व डोंगराळ परिसरातून परतताना त्यांचा अंदाज चुकला आणि त्या जंगलात वाट भरकटल्या. सायंकाळच्या सुमारास मार्ग सापडत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या 'डायल ११२' या क्रमांकावर संपर्क साधून मदतीची मागणी केली.

​कंट्रोल रूमकडून माहिती मिळताच पोलिसांनी अत्यंत वेगाने हालचाली करत स्थानिक ग्रामस्थांशी संपर्क साधला. पोलिसांनी स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन कोंढाणे लेणीच्या दिशेने डोंगराळ व दुर्गम भागात तात्काळ व्यापक शोधमोहीम हाती घेतली. भर पावसात आणि कठीण वाटेवर अथक शोध घेतल्यानंतर अखेर पथकाला दोन्ही महिला पर्यटक सुरक्षितपणे मिळून आल्या. सुटकेनंतर पोलिसांनी त्यांना कोंढाणे गावात त्यांच्या वाहनांपर्यंत सुखरूप आणून सोडले, त्यानंतर त्या सुरक्षितपणे आपल्या घराच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. संकटसमयी वेळीच मिळालेल्या मदतीमुळे महिला पर्यटकांनी रायगड पोलीस आणि स्थानिक नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले असून पोलिसांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog